एकेकाळात स्टार असणाऱ्या जॅकी श्रॉफचा आज वाढदिवस. जॅकीचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबई येथे झाला होता. एकदा जॅकी श्रॉफ रस्त्यावर उभे असताना त्यांनी एक 13 वर्षाची मुलगी पाहिली. तिला पाहून जॅकी तिच्या प्रेमातच पडले. ही मुलगी इतर कोणी नसून जॅकीची पत्नी आयशा होती.
जेव्हा जॅकीने आयशाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती 13 वर्षाची होती आणि शाळेच्या गणवेशात बसमध्ये बसली होती. जॅकी न घाबरता आयशाकडे गेले आणि तिला स्वत: बद्दल सगळे सांगितले. जॅकी पहिल्या नजरेतच आयशाच्या प्रेमात पडले होते. आयशाला काही रेकॉर्डिंग्ज विकत घ्यायचे होते आणि जेव्हा जॅकीने तिची मदत केली, तेव्हा आयशाला समजले की हा मुलगा किती चांगला आहे.
आयशाने तेव्हाच ठरवले होते की ती या माणसाशी लग्न करेल आणि नेमके हेच घडले. सुरुवातीच्या काळात जेव्हा दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली तेव्हा जॅकी चाळीमध्ये राहत होते. दुसरीकडे आयशा एका मोठ्या घराण्यातून आलेली मुलगी होती आणि तिची जीवनशैली जॅकीपेक्षा अगदी वेगळी होती. असे असले तरीही दोघांच्या प्रेमात पैशाला अजिबात प्राधान्य नव्हते. आयशा जॅकीबरोबर रस्त्यांवर फिरायची. त्यांच्याबरोबर बसमध्ये प्रवास करायची.
त्याचवेळी जेव्हा दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले तेव्हा आयशाची आई यात खुश नव्हती. तिने आपल्या मुलीला एक लक्झरी जीवनशैली दिली होती, त्यात आयशाच्या आईला असे वाटले की चाळमध्ये राहणाऱ्या मुलाशी लग्न करणे तिच्यासाठी योग्य नाही. शेवटी त्यांच्या प्रेमाचाच विजय झाला आणि 5 जून 1987 रोजी ते दोघे विवाहाबंधनात अडकले.
आयशाने लग्नाच्या तीन वर्षानंतर टायगरला जन्म दिला. त्यानंतर कृष्णा श्रॉफचा जन्म झाला. आज जॅकी श्रॉफ जे काही आहेत त्याचे सर्व श्रेय ते पत्नी आयशाला देतात. टायगर आज एक मोठा स्टार झाला आहे, तर कृष्णा सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे.