बॉलिवूडमधील श्रॉफ कुटुंब नेहमीच चर्चेत असते. जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, कृष्णा श्रॉफ एवढंच काय, तर टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी देखील नेहमीच्या प्रेक्षकांच्या चर्चेत असते. या कुटुंबातील कमी चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे आयशा श्रॉफ म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची पत्नी आणि टायगर श्रॉफची आई. आयशा श्रॉफ एक मॉडेल तसेच निर्मात्या आहेत.
आयशा श्रॉफ देखील ग्लॅमर दुनियेतील एक नावजेलेली अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांच्या सौंदर्यासोबतच त्या स्टंट्स आणि ऍक्शनसाठी देखील प्रसिद्ध आहेत. आयशा श्रॉफ यांनी 1984 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तेरी बाहो में’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्यांनी मोहनीस बहल यांच्यासोबत काम केले होते.
आयशा श्रॉफने त्यांचे पती जॅकी श्रॉफ यांच्यासोबत मिळून ‘जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड’ नावाची प्रॉडक्शन कंपनी लाँच केली आहे. यामध्ये अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत.
वयाच्या 60 व्या वर्षी देखील आयशा खूप सुंदर आणि फिट दिसत आहेत. आयशा लवकरच ऑनस्क्रीन प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सर्वत्र चालू होती. 80 च्या दशकात कमी कालावधीत आपले नाव कमावणारे अभिनेते जॅकी श्रॉफ यांना पहिल्या नजरेत आयशा खूप आवडल्या होत्या. पण आयशा यांचे वय खूप कमी असल्याने त्यांनी कधी त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला नाही. 1987 मध्ये आयशा यांच्या वाढदिवशी आयशा आणि जॅकी श्रॉफ यांनी लग्न केले.
आयशा श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांना 2 मुले आहेत. टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ. टायगर श्रॉफ त्याच्या आईवर खूप प्रेम करतो. तसेच आयशा देखील टायगरला तिचे दुसरे प्रेम मानते.
टायगरने त्याच्या आई सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा
-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी