Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड अडचणी संपता संपेनात! आता जॅकलीन फर्नांडिसने शोधला ‘हा’ रामबाण उपाय

अडचणी संपता संपेनात! आता जॅकलीन फर्नांडिसने शोधला ‘हा’ रामबाण उपाय

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससाठी (jacqueline fernandez) हे वर्ष चांगले ठरेल असे वाटत नाही. सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे कथित संबंध उघड झाल्यापासून ती फसवणूक प्रकरणात अडकत आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्रीचे नाव २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आले आहे. त्यामुळेच ती दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. आता  चौफेर संकटातून जात असलेल्या जॅकलिनने आता धार्मिक मार्ग स्वीकारला आहे. ज्याबद्दलचा नुकताच खुलासा  केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीनच्या जवळच्या मैत्रिणीने तिला हा कठीण काळ चांगल्या काळात बदलण्यासाठी छतरपूर येथील गुरुजींच्या आश्रमात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून जॅकलीन आता गुरुजींचे ब्रेसलेट परिधान करून सर्वत्र गुरुजींना घेऊन जात आहे आणि दिवसातून एकदा गुरुमंत्राचा जपही करत आहे.

हेही वाचा – आकांशा पुरीच्या बोल्डनेसचा जलवा! मिका सिंगने केली ‘अशी’ कमेंट
बंगाली अभिनेत्रीमुळे मिळाला बॉलिवूडचा पहिला ‘ग्लॅमर’ चेहरा! दिलीप कुमार यांच्याशी होते खास नाते.
अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची खास आठवण; म्हणाले, “त्यांनी एक पॅग घेतला की ते…”

हे देखील वाचा