Tuesday, March 5, 2024

बंगाली अभिनेत्रीमुळे मिळाला बॉलिवूडचा पहिला ‘ग्लॅमर’ चेहरा! दिलीप कुमार यांच्याशी होते खास नाते

बॉलिवूडमध्ये 1940 ते 1950 मध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री होउन गेले आहेत जे अभिनय आणि वैयक्तीक आयुष्यामुळे नेहमीच लक्षात राहतात. आपण पाहिले आहे की, काही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने आख्खं बॉलिवूड गाजवले होते. तसेच त्यांचे वैयक्तीक आयुष्य देखील तेवढेच रंजक असते आणि त्यामुळे अभिनयासोबतच वैयक्तीक आयुष्यामुळे देखील चर्चेत आले होते. माेत्र, असे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. आज आपण अशाच कलाकराबद्दल जाणून  घेणार आहोत ते कलाकार म्हणजे बॉलिवूडची पहिली ग्लॅमर अभिनेत्री ‘बेगम पारा‘ आणि ‘दिलीप कुमार’ यांच्या आयुष्यातील नात्याबद्दल.

बेगम पारा
बेगम पारा ( Begum para ) या 1940 ते 1950 च्या शतकातील एक नामांकित अभिनेत्री होत्या. ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमर अदाने त्या काळी युवकांच्या दिलावर राज्य केले होते. जरी त्यांना बॉलिवूडची पहिली ग्लॅमर अभिनेत्री असा खिताब भेटला नसला तरी बेगम पारा यांना पहिली ग्लॅमरस अभिनेत्री बोलणे चुकीचे ठरणार नाही.

अभिनयाच्या दुनियेत त्यांना बेगम पारा या नावानेच अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, त्यांच्या आयुष्यातील त्यांचे खरे नाव ‘जुबेदा उल हक’ असे होते. वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, बेगम यांनी 1951 मध्ये लाइफ मॅगजिनसाठी ग्लॅेमरस  फोटोशूट केले होते. ‘जेम्स बर्क’ नावाच्या फोटोग्राफरने हे फोटोशूट केले होते, त्यामुळे बेगम पारा देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध झाल्या होत्या. या अभिनेत्रीला ‘आयुब’ नावचा एक मुलगा आहे, तो एक नामांकित कलाकार असून तो टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये साह्यक भुमिकांमध्ये काम करत असतो.

या अभिनेत्री एवढ्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, त्यांच्या विषयी अशा काही चर्च्या होत्या. एकवेळेस बेगम पारा एवढ्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, अमेरिकन सैनिक त्यांचा फोटो खिश्यात घेउन युद्धाला जात असे. त्यांचे वडील न्यायधीश होते जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीशही होउन गेले होते. बेगम पारा यांचे वडील ‘एहसानुल-हक उत्तरी’ न्यायलयाच्या सेवेसाठी काम करत होते, त्यामळे त्यांचे लहाणपन बिकानेरमध्येच गेले होते.

बेगम पारा यांनी अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीमधून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. चित्रपटामध्ये येण्याचा प्रवास खूप रंजक होता, एकदा त्यांच्या भावाला एक्टिंग दुनियामध्ये दाखला घेण्यासाठी 1930 मध्ये मुंबईमध्ये आले होते, तेव्हा त्यांची भेट बंगाली अभिनेत्री ‘प्रोतीमा दासगुप्ता’ यांच्याशी झाली होती. हळुहळु दोघांमध्ये प्रेमाचे फुल फुलले आणि मग त्यांनी लग्न केले.

बेगम पारा यांचा चित्रपटामध्ये पदार्पणाचा भन्नाट किस्सा
बेगम पारा जेव्हा त्यांच्या वहिनीला भेटण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांचे शानदार आयुष्य पाहुन त्या खूपच प्रभावित झाल्या होत्या. प्रोतिमा यांच्यामुळे् त्यांना फिल्मीदुनियेतील पार्टीमध्ये जायला मिळायचे, बेगम पारा दिसायला खूपच सुंदर होत्या त्यामुळे त्यांना चित्रपटाचे ऑफर येउ लागले. सगळ्यात आधी शशधर मुखर्जी आणि देविका राणी यांनी एका चित्रपटामध्ये काम करण्याचे ऑफर दिले होते आणि तिथूनच त्यांचा चित्रपट दुनियाचा प्रवास सुरु झाला होता.

बेगम पारा यांनी दिलीपकुमार यांच्या
बेगम पारा पहिल्यांदा ‘चांद’ या चित्रपटात झळकल्या होत्या. हा चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यांच्या ग्लॅमर चेहऱ्याला पाहुण त्यांना भुमिका मिळत होत्या. मग त्यांनी नासीर खान यांच्यासोबत लग्न केले, जे दिलिपकुमार यांचे भाऊ होते. बेगम पारा यांनी शेवटी 2007 मध्ये ‘सांवरीया’ या चित्रपटामध्ये सोनम कपूरच्या आज्जीची भुमिका केली होती. आणि शेवटी 2008 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जेव्हा ‘या’ अभिनेत्याच्या लग्नाच्या वरातीत एकत्र पोहचले राज कपूर-दिलीप कुमार, अनसीन फोटो व्हायरल
आणखी काय हवं! शालीन भानोतने टीना दत्तासाठी केला 25 लाखांचा त्याग?

हे देखील वाचा