Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सर्वाधिक पोलिसांची भूमिका निभावून जगदीश राज खुराना यांनी केला होता रेकॉर्ड, वाचा त्यांची कहाणी

अभिनयाच्या दुनियेत, अभिनेते विविध पात्रे साकारतात, जरी शेवटी हे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून असते, परंतु काही पात्रे अशी असतात ज्यात अभिनेता किंवा अभिनेत्री प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर वेगळी छाप सोडतात. असाच एक कुशल कलाकार होता अभिनेता जगदीज राज. (jagdish raj) जो पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होता आणि याच कारणामुळे त्याने इतिहासही रचला. सिनेसृष्टीतील या दिग्गज कलाकाराने २५ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला. जाणून घ्या जगदीश राजबद्दल काही खास गोष्टी.

सिनेमाच्या दुनियेत कोणते पात्र किंवा संवाद कधी हिट होतात हे खुद्द कलाकारालाही कळत नाही. अभिनेते जगदीश राज यांचा प्रवासही असाच होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकामागून एक पोलिसाची भूमिका केली आणि तो विक्रम करेल असे वाटले नव्हते. त्यांनी संपूर्ण चित्रपटांमध्ये 144 वेळा पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आणि यासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवले गेले.

1928 मध्ये जन्मलेले जगदीश राज यांचा जन्म ब्रिटिश भारतातील सुरगुजा येथे झाला. जो आता पाकिस्तानचा भाग आहे. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या जगदीश राज यांनी नंतर पोलिसांचा गणवेश शिवून घेतल्याचे बोलले जाते. भूमिकेसाठी निर्माता दिग्दर्शकाचा फोन येताच ते थेट वेशभूषेत सेटवर जायचे.

असं म्हटलं जातं की, जेव्हा एका हॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरला जगदीश राजबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. त्यानंतर गिनीज बुकच्या टीमला तपासासाठी पाचारण करण्यात आले आणि अशाप्रकारे चित्रपटांमध्ये पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारून जगदीश राज यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

जगदीश राज यांनी आपल्या कारकिर्दीत अमिताभपासून देवानंदपर्यंत अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केले होते. ‘हम दूं’, ‘जुगार’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘काला बाजार’, ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘दीवार’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनयाने आपली छाप पाडली.

अभिनेता जगदीश राज यांनी बरेच चित्रपट केले परंतु 80 आणि 90 च्या दशकात त्यांचा अभिनय जगतातील सहभाग कमी दिसून आला आणि 1992 मध्ये त्यांनी चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. अभिनेता जगदीश यांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले होते. यानंतर 28 जुलै 2013 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी जुहू येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अरे देवा! भारती सिंगने पोराला चक्क केले जोकर, चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

आमिर खानसोबतच्या ‘त्या’ जाहिरातीने बदलले हुमा कुरैशीचे आयुष्य, ‘असा’ मिळाला होता पहिला चित्रपट

‘कुंदन’ बनत बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या धनुषने केवळ सहा मिनिटात लिहिले होते ‘कोलावेरी डी’; वाचा त्याचा सिनेप्रवास

हे देखील वाचा