नुकताच दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा सुपरस्टार सुर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर टीएस गनानवेल आहेत. तुम्हाला हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि मेगास्टार कमल हासन यांनीही सुर्याचे उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन केले आहे. मात्र, असे असूनही हा चित्रपट वादाच्या जाळ्यात अडकला आहे. चला तर मग या चित्रपटाची कथा आणि रिव्ह्यू जाणून घेऊया.
या चित्रपटात एक असा सीन आहे, ज्यामध्ये प्रकाश राज एका व्यक्तीला कानाखाली मारतात, जेव्हा त्या व्यक्तीने कानाखाली मारण्याचे कारण विचारले तेव्हा प्रकाश राज त्याला म्हणतात की, हिंदी मध्ये का बोलला. ती व्यक्ती हिंदीत बोलत होती. या सीनपासूनच चित्रपटाबाबत एकच गोंधळ उडाला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
या चित्रपटात १९९५ साली तामिळनाडूमध्ये झालेला जातीय छळ आणि पोलिसांची क्रूरता दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे… म्हणजे दलित-आदिवासींवर ज्या प्रकारची क्रूरता व्हायची, तीच क्रूरता आजही घडली आहे आणि घडते आहे. हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीक्वेन्समध्ये एका आदिवासी माणसाला तुरुंगातून पोलिस व्हॅनमध्ये बसवल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला दिली जाते. गावाबद्दल सांगायचे झालं, तर इरुला आदिवासींचा एक गट श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांचे शेत वाचवतो. तो साप पकडण्यात आणि कोब्रा इत्यादीसारखे मोठे आणि धोकादायक साप पकडण्यात तज्ञ असतो. पण तो कितीही उपयुक्त असला, तरी त्याची स्थिती नेहमीच अनिश्चित असते.
रिव्ह्यू
आदिवासी लोक त्यांची निरागसता आणि सत्य या चित्रपटात दिग्दर्शकाने उत्तम प्रकारे दाखवले आहे. चित्रपटातील सर्व पात्रे कृष्णधवल असली, तरी हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. उच्च न्यायालयात खटल्याच्या कार्यवाहीचे योग्य प्रकारे रेकॉर्डिंग करण्यातही हा चित्रपट मोठा आहे. मणिकंदन आणि लिजो मोल जोस यांनी आदिवासी जोडपे म्हणून चांगले काम केले आहे. सूर्याचे काम पाहून तुमची नजर हटणार नाही. त्याला पाहून तुम्हाला वाटेल की, तो खरा वकील आहे. त्याचे दमदार सीन्स पाहून तुमचाही उत्साह भरून येईल. त्याचबरोबर भावूक सीन पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
‘जय भीम’च्या आर्ट डिपार्टमेंटचेही कौतुक करायला हवे. त्यांनी ९० चे दशक खूप छान दाखवले आहे. हा चित्रपट अधिक चांगला बनवण्यासाठी उच्च न्यायालयाची कार्यवाही आणि सेटवरचे काम हे सर्वात महत्त्वाचे आहे. चित्रपटाचा दुसरा सायलेंट हिरो एसआर कथिरची सिनेमाटोग्राफी आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नादच खुळा! अल्लू अर्जुनपासून ते सूर्यापर्यंत १०० कोटींच्या क्लबचे बादशाह आहेत ‘हे’ साऊथ सुपरस्टार्स
-सूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’ सिनेमाचा फर्स्ट लूक