सूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’ सिनेमाचा फर्स्ट लूक


कोरोनाच्या संसर्गामुळे चित्रपटाचे चित्रपटगृहांमधले प्रदर्शन जरी सध्या थांबले असले, तरी नवीन चित्रपटांच्या घोषणा जोरदार सुरु आहेत. थियेटरमध्ये जरी सिनेमे प्रदर्शित होत नसले, तरी आता निर्माता, दिग्दर्शकांना ओटीटी प्लॅटफॉर्म हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. अनेक कलाकार किंवा सिनेमाशी संबंधित असलेले महत्वाचे लोकं चित्रपटाची घोषणा, फर्स्ट लूक आदी कलाकारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेअर करतात. बऱ्याचदा आपण अशी उदाहरणं बघतो. हा ट्रेंड हिंदीसोबतच साऊथमध्ये देखील बघायला मिळतो.

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार असणारा अभिनेता सूर्याने काल (२३ जुलै) रोजी त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने त्याच्या वाढदिवसाचे एक खास गिफ्ट त्याच्या फॅन्सला दिले आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सूर्या लवकरच ‘जय भीम’ सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. सूर्याने त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले आहे. (Suriya shares first look poster of jai bhim on his birthday)

सूर्या या सिनेमात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमात ट्राइबल कम्यूनिटीच्या लोकांच्या हक्कांसाठी लढताना दिसेल. सूर्यासाठी हा सिनेमा खूप स्पेशल असणार आहे, कारण हा त्याचा ३९ वा सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीएस गनानवेल यांनी केले असून, चित्रपटाचे शूटिंग चेन्नईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुर्वीच सुरु झाले होते, मात्र नंतर ते थांबवण्यात आले.

सूर्याने हा लूक शेअर करताना लिहिले, “जय भीम चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना मी खूपच उत्साहित आहे.” पोस्टरमध्ये सूर्याचा ब्लॅक कोटमध्ये इंटेन्स लूक दिसत आहे.

‘जय भीम’ सिनेमात सूर्यासोबत प्रकाश राज, राजिशा विजयन महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सूर्या या सिनेमात अभिनय तर करतच आहे सोबतच तो या चित्रपटाची निर्मिती देखील करणार आहे. हा सिनेमा सूर्याचे प्रोडक्शन हाऊस 2d एंटरटेनमेंटच्या अंतर्गत तयार होत आहे.

सूर्याने या सिनेमासोबतच त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी Etharkkum Thunindhavan सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पंडिराज यांनी केले असून, प्रियंका अरुल मोहन, सत्यराज यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.