Monday, July 1, 2024

ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

लोकप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे शुक्रवारी (8 सप्टेंबर) निधन झाले आहे. त्यांच्या निधनमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककाळा पसरली आहे. ते 58 वर्षांचे होते. सकाळी 8.30 च्या सुमारास ते टीव्ही शो ‘इथर नीचल’च्या डबिंगसाठी गेले होते. यादरम्यान ते खाली पडले. त्यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

झालं असं की, जी मारीमुथू (G Marimuthu ) हे डबिंगसाठी गेले हेते. सेटवर असताना त्यांना अचानक त्रास व्हायला लागला आणि ते खाली पडले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्याचा त्यावेळी मृत्यूव झाला होता. जी मारीमुथू रजनीकांतच्या ‘जेलर‘ आणि ‘रेड सँडल वुड’मध्ये मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी बॅकियलक्ष्मी आणि दोन मुले – अकिलन आणि ईश्वर्या असा परिवार आहे.

जी. मारिमुथू हे त्यांचे मत बिनधास्तपणे मांडण्यासाठी ओळखले जात होते. ज्यामुळे काहीवेळा सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. अलीकडेच त्याने ‘जेलर’मध्ये खलनायकाच्या सहाय्यकाची भूमिका साकारली होती. 8 सप्टेंबर रोजी ते त्यांचे सहकारी कमलेशसोबत ‘इथर नीचल’ या टीव्ही शोसाठी डबिंग करत होता. हे डबिंग चेन्नईतील एका डबिंग स्टुडिओत होते.

डबिंग करताना ते बेशुद्ध पडले. त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजलीसाठी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Jailor fame actor G Marimuthu passed away due to heart attack)

अघिक वाचा-
शिल्पा शेट्टीने सांगितला सुखी संसाराचा मूळ मंत्र; म्हणाली, ‘नवरा बायकोने एकत्र…’
शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला इतिहास, कोट्यावधीमध्ये कमाई करणारा ठरला बॉलिवूडमधील पहिला ओपनिंग सिनेमा

हे देखील वाचा