Friday, July 12, 2024

शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला इतिहास, कोट्यावधीमध्ये कमाई करणारा ठरला बॉलिवूडमधील पहिला ओपनिंग सिनेमा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा अखेर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीचर रिलीज झाल्यापासूनच सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. तर शाहरुख खानचा हा चित्रपट देखील इतर चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळा आणि भन्नाट असणाऱ्या याची प्रेक्षकांना खात्री होती आणि प्रेक्षकांचा हाच विश्वास खरा ठरला आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट रिलीज होऊन एकच दिवस झालेला आहे. परंतु या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यावधीमध्ये कमाई केलेली आहे. बॉलिवूडमध्ये पहिल्याच दिवशी कोट्यावधीमध्ये कमाई करणारा जवान हा पहिला चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटात e बॉलीवूडच्या इतिहासात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स, ॲक्शन या सगळ्यांनी त्याच्या फॅन्सचे लक्ष वेधले आहे. सगळ्यांनाच हा चित्रपट जबरदस्त आवडला आहे. तसेच चित्रपटाचे रिव्ह्यू देखील खूप चांगले प्रकारे येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केलेली आहे. तर केवळ हिंदी वर्जनने 65 कोटीची कमाई केलेली आहे. याआधी शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली होती. परंतु शाहरुख खानच्या या चित्रपटाने सगळ्या चित्रपटांना मागे सारून खूप चांगली कमाई केलेली आहे.

‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि नयनतारा यांची देखील चांगली झलक पाहायला मिळते प्रेक्षकांना या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय देखील खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
शिल्पा शेट्टीने सांगितला सुखी संसाराचा मूळ मंत्र; म्हणाली, ‘नवरा बायकोने एकत्र…’
‘आपकी अदालत’मध्ये पाऊल टाकताच प्रेक्षकांचं प्रेम पाहून ढसाढसा रडला सनी देओल, व्हिडिओ आवर्जून पाहाच

हे देखील वाचा