प्रसिद्ध टीव्ही शो फ्रेंड्समध्ये ९० च्या दशकातील गंथरची भूमिका करणारा अभिनेते जेम्स मायकल टायलर यांचे रविवारी (२४ ऑक्टोबर) रात्री निधन झाले आहे. जेम्स यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. २०१८ मध्ये जेम्स यांना स्टेज आयव्ही प्रोस्टेट कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यांनी जूनमध्ये सांगितले की, त्यांना केमोथेरपी मिळत आहे. या वर्षीच्या फ्रेंड्स रीयूनियनमध्ये जेम्स झूमच्या माध्यमातून जोडले गेले होते.
ब्राइटने ट्विट करत लिहिले की, “जेम्स मायकेल टायलर, आमचे गंथर, यांचे काल रात्री निधन झाले. ते एक अद्भुत व्यक्ती होते, ज्यांनी आपले शेवटचे दिवस इतरांना मदत करण्यात घालवले. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, गंथर कायम जिवंत राहील.” जेम्स यांच्या मॅनेजरने सांगितले की, फ्रेंड्स शोचा सातवा मित्र म्हणून जग त्यांना ओळखते, पण जेम्स एक अभिनेता, संगीतकार, कॅन्सर जागरूकता वकील आणि एक प्रेमळ पती होते.”
Warner Bros. Television mourns the loss of James Michael Tyler, a beloved actor and integral part of our FRIENDS family. Our thoughts are with his family, friends, colleagues and fans. ❤️☕️ pic.twitter.com/9coGnT5BHz
— FRIENDS (@FriendsTV) October 24, 2021
फ्रेंड्स शोमध्ये जेम्स यांनी सेंट्रल पर्क कॉफी शॉपमध्ये काम करणारा वेटर गंथरची भूमिका साकारली होती. संपूर्ण शोमध्ये गंथरचे रेचेलवर (जेनिफर ॲनिस्टन) एकतर्फी प्रेम आहे आणि एक दिवस कदाचित रेचेल देखील त्याच्या प्रेमात पडेल असे स्वप्न पाहतो. शोमध्ये गंथर म्हणजेच मायकल यांच्या असण्याने खूप मजेदार क्षण होते. जेम्स हे ‘सबरीना द टीनेज विच’ आणि ‘सक्रब्स’मध्ये देखील दिसले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रेम हे! कोरियन अभिनेत्याने मागितली एक्स गर्लफ्रेंडची माफी, तिनेही केले मोठ्या मनाने माफ
-धक्कादायक! सेटवर झाला गोळीबार, चुकून झाडडेल्या गोळीमध्ये सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू