भारी! दिवंगत अभिनेता पॉल वॉकरच्या मुलीने थाटला संसार; मित्राच्या मुलीसाठी वडील बनून पोहोचला विन डिझेल

दिवंगत हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरची मुलगी आणि मॉडल मीडो वॉकरने अभिनेता लुई थॉर्नटन एलनसोबत लग्न केले आहे. आता ती तिच्या लग्नाचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने तिच्या लग्नातील काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मीडोने शेअर केलेल्या या काही फोटोमध्ये आपण बघू शकतो की, पॉल वॉकरचे काही मित्र आणि को-स्टार विन डिझेल लग्नामध्ये वधूसोबत चालताना दिसत आहे. विनने मीडोच्या या सर्वात खास क्षणी तिच्या वडिलांची जागा भरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने तिच्या लग्नात तिच्या वडिलांचे कर्तव्य पार पाडले आहे. (Paul Walker daughter meadow walker gets married vin Diesel walked dawn the aisle at her wedding)

तिच्या लग्नात अगदी मोजकेच पाहुणे आले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही लग्न बंधनात अडकलो आहोत.”

View this post on Instagram

A post shared by Meadow Walker (@meadowwalker)

यासोबतच मीडोने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती विन डिझेलसोबत चालताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये लुई थॉर्नटन एलनसोबत दिसत आहे. तिचे लग्न झाल्यामुळे हॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. तसेच तिचे अनेक चाहते देखील त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

https://www.instagram.com/p/CVWUs1Np-4X/?utm_source=ig_web_copy_link

लग्नात विन डिझेल आणि मीडो वॉकर यांना एकत्र पाहून तिचे चाहते खूप भावनिक झाले आहेत. तिच्या लग्नात ‘फास्ट आणि फ्युरिअस’चे विन डिझेलसोबत फ्रँचायझीमध्ये पॉल वॉकरची ऑनस्क्रीन लेडी लव जॉर्डना ब्रियूस्टर हिला देखील आमंत्रण मिळाले होते. पॉल वॉकरचे २०१३ साली निधन झाले होते. त्यावेळी तो केवळ ४० वर्षाचा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Post