Wednesday, June 26, 2024

जान्हवी कपूरच्या नव्या अदा, सोशल मीडियावर फोटो घालतायेत धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने खूप कमी कालावधीत तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या परंतु जान्हवी ने तिच्या स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर तिचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर येताच ते वेगाने व्हायरल होय असतात. अशातच तिचे आणखी काही नवीन फोटो समोर आले आहेत.

जान्हवी कपूरने (janhavi kapoor)  तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Janhavi Kapoor share her photos on social media)janhavi kapoor)

इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो सगळ्यांना खूप आवडत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ५ लाखापेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत जोडून असते.

जान्हवीने आतापर्यंत जास्त चित्रपटात काम केले नाही.परंतु तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिला कोरोना झाला होता. आता तिची तब्येत ठीक आहे.

जान्हवी कपूर तमिळ चित्रपट ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात काम करत आहे. तसेच ती ‘दोस्ताना २’ आणि ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. तिने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून तिने खूप ओळख मिळाली तसेच तिच्या कामाचे देखील सर्वत्र कौतुक झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा