Monday, July 1, 2024

टाईट कपडे घालणे पडले जान्हवीला महागात! वडिलांसमोरच झाली ‘अशी’ फजिती, व्हिडिओ होतोय व्हायरल

हिंदी सिने जगतातील अभिनेत्री त्यांच्या अभिनयाइतक्याच जबरदस्त फॅशनमुळेही नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या स्टाईलिस्ट आणि बोल्ड लूकचे फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात. ज्यावर त्यांच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात.  मात्र कधीकधी अभिनेत्रींचे हे स्टाईलिस्ट ड्रेस त्यांची पब्लिकमध्ये चांगलीच फजिती करतात. असाच प्रकार अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत (Janhavi Kapoor) घडला असून तिच्या वूप्स मुमेंटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. 

जान्हवी कपूरचा चित्रपट ‘गुड लक जेरी’ 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जान्हवी कपूरने एक स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. यादरम्यान जान्हवी कपूर इतका टाईट बॉडीकॉन ड्रेस घालून आली होती की ती ड्रेस वारंवार गळ्यापासून वरच्या बाजूला सरकवताना दिसत होती. विशेष बाब म्हणजे यावेळी जान्हवी कपूर तिची धाकटी बहीण खुशी आणि वडील बोनी कपूरसोबत पापाराझींसमोर पोज देताना दिसली. अभिनेत्रीच्या स्क्रिनिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग 30 जुलै रोजी रात्री उशिरा मुंबईत पार पडले. या खास प्रसंगी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस निवडला. त्याचवेळी बोनी कपूर आणि खुशी कपूर यांनीही व्हाइट कलरचे पोशाख कॅरी केले होते. जान्हवी रेड कार्पेटवर येताच कॅमेरे तिच्याकडे वळले. पापाराझींसमोर जान्हवी कपूर सतत एकापेक्षा एक जबरदस्त  पोज देताना दिसत होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

 

यावेळी जान्हवी कपूरने इतका टाइट ड्रेस परिधान केला होता की, या ड्रेसमध्ये तिची फिगर स्पष्ट दिसत होती. त्याचवेळी या ड्रेसचा गळा खूप खोल होता, जो लोकांचे लक्ष वेधून घेत होता. या ड्रेसच्या मानेमुळे अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर थोडी अस्वस्थ दिसली आणि गळ्याच्या बाजूने वारंवार ड्रेस वर सरकताना दिसली. लूकबद्दल बोलायचे तर जान्हवी मोकळ्या केसांसह हलक्या मेकअपमध्ये दिसली. याआधी जान्हवी कपूर जीमच्या बाहेर अशाच कपड्यांमध्ये दिसली होती. ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.

हेही वाचा –

शूटिंगवेळी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही वरुण धवनला झापत होते वडील, अभिनेता हंबरडा फोडत गेलेला गाडीत

सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवानी! ऑगस्ट महिना ठरणार हाऊसफूल, प्रदर्शित होणार ‘हे’ धमाकेदार चित्रपट

तब्बल २७ वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या मागे नाचणारा रेमो आज बनलाय प्रसिद्ध कोरिओग्राफ्रर, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा