Tuesday, April 16, 2024

शूटिंगवेळी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही वरुण धवनला झापत होते वडील, अभिनेता हंबरडा फोडत गेलेला गाडीत

बॉलिवूडमधील अशा अनेक बाप-लेक जोड्या आहेत, ज्यांनी एकत्र काम केले आहे. यापैकीच एक म्हणजे वरुण धवन आणि डेव्हिड धवन होय. अभिनेता वरुण धवन त्याचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन हे खूपच खास बाँड शेअर करतात. बाप-लेकाची जोडी असो किंवा अभिनेता-दिग्दर्शकाची जोडी, दोघांमध्येही चांगली बाँडिंग पाहायला मिळते. मात्र, अनेकदा अभिनेत्याला त्याच्या वडिलांच्या रागाचाही सामना करावा लागला आहे. नुकतेच त्याने एका घटनेची आठवण काढत मजेशीर किस्सा सुनावला.

वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या आगामी ‘बवाल’ (Bawaal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरदिवशी तो त्याच्या आगामी सिनेमातील शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच माध्यमांशी संवाद साधताना त्याला विचारले गेले की, त्याला कधी त्याच्या वडिलांकडून ओरडा बसला आहे का? यावर अभिनेत्याने ‘मैं तेरा हिरो’ या सिनेमादरम्यानचा एक किस्सा सांगितला, जेव्हा सर्वांसमोर वडील डेव्हिड धवन त्याच्यावर चिडले (Varun Scolded By Father David Dhawan) होते.

वरुणने सांगितले की, “मी सेटवर बाईक सीन करत होतो, तेव्हा अचानक पडलो आणि माझ्या हाताला दुखापत झाली. रक्त वाहू लागले होते. त्यावेळी माझ्या वडिलांनी माईकवरच सर्वांसमोर म्हटले की, ‘अरे अरे अरे, नाजूक बाळाला दुखापत झाली. खूपच नाजूक सिनेमातून आला आहे ना… याला समजावून सांगा यार आपल्याकडे वेळ नाहीये, अशा फुसक्या हिरोसाठी.'”

पुढे बोलताना वरुणने सांगितले की, कशाप्रकारे रडत रडत तो आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेला होता. त्याने सांगितल्यानुसार, त्याचा मोठा भाऊ रोहित धवन हसत हसत त्याच्याकडे आला आणि म्हणाला की, “अरे भावा तू त्या सिनेमात काम करत आहेस, ज्याचे दिग्दर्शन वडील करत आहेत, आई नाही. त्यांचे प्रेम असेच आहे.” तसं वरुणने यापूर्वीही वडिलांकडून मिळालेल्या ओरड्याबद्दलही सांगितले आहे. त्याने एकदा म्हटले होते की, “आतापर्यंत माझ्या कोणत्याही सिनेमाला १०० टक्के लोकांकडून पसंती मिळाली नाहीये. एके दिवशी मी १०० टक्के हे साध्य करेल आणि वडिलांना दाखवेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन नुकताच ‘जुग जुग जिओ’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात प्रसिद्ध युट्यूबवर प्राजक्ता कोळी हीदेखील होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
तब्बल २७ वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या मागे नाचणारा रेमो आज बनलाय प्रसिद्ध कोरिओग्राफ्रर, व्हिडिओ केला शेअर
इंदिरा गांधींनंतर आणखी एक राजकीय भूमिका साकारणार कंगना, मधुर भांडाकर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
संस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

हे देखील वाचा