Monday, July 1, 2024

‘अभिनय तर येत नाही, अहंकार भरलाय फक्त…’, चाहतीला इग्नोर केल्यामुळे जान्हवी कपूरवर भडकले नेटकरी

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या बरीच चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्री बांद्रा येथे शनाया कपूर (Shanaya Kapoor) आणि अनन्या पांडेसोबत (Ananya Panday) दिसली होती. कारमधून खाली उतरून तिघीही हॉटेलच्या दिशेने जात असताना, तेथे खूप गर्दी झाली. दरम्यान, एका महिलेने जान्हवीला सेल्फीसाठी विनंती करण्यास सुरुवात केली, मात्र जान्हवी दुर्लक्ष करून पुढे गेली. आता जान्हवीला महिलेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

खरं तर, जान्हवी शनाया आणि अनन्यासोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. गाडीतून उतरताच बाहेर पॅपराझी आणि चाहत्यांची गर्दी जमली. त्यामुळे तिघींना हॉटेलच्या आत नेण्यासाठी गार्डला यावे लागले. यावेळी सर्वजण जान्हवीच्या नावाने ओरडत होते. जान्हवी पुढे असताना एक महिला तिच्या मागे आली आणि सेल्फीसाठी विनंती करू लागली. मात्र जान्हवी थेट हॉटेलच्या आत गेली. महिलेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता नेटकरी जान्हवीला खरे-खोटे ऐकवत आहेत. (janhvi kapoor gets rolled for ignoring a woman who requested her for a selfie)

जान्हवीचे हे वागणे लोकांना अजिबात आवडले नाही आणि यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. एका यूजरने कमेंट केली, “ऍटिट्यूड पाहा यांचा.” तर दुसऱ्याने लिहिले, “अभिनय तर येत नाही, नुसता गर्व भरलेला आहे.” त्याचवेळी एकाने लिहिले की, “तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे की, ‘मी श्रीमंत मुलगी आहे आणि गरीबांशी बोलत नाही.'” जान्हवीबद्दल अशाच अनेक कमेंट्स केल्या जात आहेत.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘गुड लक जेरी’, ‘तख्त’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. जान्हवी शेवटची २०२१ मध्ये राजकुमार रावसोबत ‘रुही’ चित्रपटात दिसली होती. त्याचवेळी तिने २०१८ मध्ये ‘धडक’ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा