बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी अभिनेत्रीला अशक्तपणा जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. माध्यमातील वृत्तानुसार, बुधवारी जान्हवी अशक्त आणि अस्वस्थ वाटत होती, त्यामुळे ती अंथरुणावर होती. गुरुवारी प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले.
माध्यमातील वृत्तानुसार, जान्हवीच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितले की तिला अन्नातून विषबाधा झाली आहे, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिने तिच्या सर्व मिटींग्स पुढे ढकलल्या आहेत. गुरुवारी प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी योग्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्या मैत्रिणीने असेही सांगितले की ती आता बरी होत आहे, तथापि, तिला अजूनही खूप कमजोरी आहे.
तिच्या मैत्रिणीने असेही सांगितले की, अभिनेत्रीला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. मात्र, जान्हवीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ही बातमी येण्यापूर्वी अभिनेत्री 15 जुलै रोजी तिच्या आगामी ‘उलज’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिसली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. तिच्या ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात ती अनंत आणि राधिकाच्या लग्नात दिसली होती. या लग्नात ती तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रश्मीका मंदानाच्या जवळच्या व्यक्तीचे निधन; सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट शेअर
ऋचा चढ्ढाने प्रेग्नेंसीचे फोटो केले शेअर, पण ‘या’ कारणामुळे कमेंट सेक्शन केले बंद