Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड गर्ल गँगसोबत जंगलात फिरताना, नदीत डुबकी मारताना दिसली जान्हवी कपूर, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

गर्ल गँगसोबत जंगलात फिरताना, नदीत डुबकी मारताना दिसली जान्हवी कपूर, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

सध्या इंडस्ट्रीमध्ये आणि सोशल मीडियावर स्टार्सकिड्सचा जबरदस्त बोलबाला आहे. या सर्व स्टार्सकिड्सच्या यादीमध्ये अनेक अनेक किड्सने अभिनयात पदार्पण केले आहेत, तर काही पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. सध्याच्या आघाडीच्या स्टार्सकिड्समध्ये जान्हवी कपूरने अभिनय, चित्रपट, फॅन्स, सोशल मीडिया या सर्व बाबतीत खूपच आघाडी घेतली आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या या लेकीने खूप कमी वेळात तिचे इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केले आहे. तिने तिच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतच सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट आणि व्हिडिओमुळे देखील खूपच लाईमलाइट मिळवले आहे. जान्हवी नेहमीच तिच्या सोशल मीडियापोस्टमुळे खूपच चर्चेत असते.

सध्या जान्हवी तिच्या गर्ल गँगसोबत धकाधकीच्या जीवनापासून लांब जंगलामध्ये तिचा वीकएंड साजरा करत आहे. शूटिंगच्या निमित्ताने सतत कामात अडकलेल्या जान्हवीने थोडा वेळ स्वतःसाठी काढत तिच्या मैत्रिणींना घेऊन तिने थेट जंगल गाठले आहे. जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहे. यात आपण पाहून शकतो की, ती तिच्या मैत्रिणींसोबत निसर्गाचा आनंद घेत आहे.

तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये जान्हवीने चक्क जंगलात असणाऱ्या एका नदीमध्ये डुबकी मारली. जान्हवीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, जान्हवीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला असून, ग्रीन रंगाची शॉर्ट घातली आहे. तिच्या या ड्रेसवर तिने घातलेल्या दोन वेण्या खूपच क्युट दिसत आहे. जान्हवीने नदीत डुबकी मारलेला हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स त्यावर एका पेक्षा एक कमेंट्स करत आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती, सिद्धार्थ सेनगुप्ताच्या ‘गुड लक जेरी’ सिनेमात तर करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘रुही’ हा सिनेमात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिवाद दिला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा