‘ब्रायडल एशिया’ मासिकासाठी जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट; ‘इतक्या’ लाखाच्या लेहंग्यात अभिनेत्रीचा जलवा


कलाकार आणि त्यांचे सोशल मीडिया पोस्ट म्हणजे त्यांना चर्चेत असण्याचा एक उत्तम पर्याय आहे. सोशल मीडियावर कलाकार ज्या पोस्ट शेअर करतात त्या पोस्टमुळे कलाकार भरपूर लाइमलाइट मिळवतात. या पोस्टमध्ये व्हिडिओ, फोटो, अपडेट काहीही असले तरी ते गाजणार हे नक्की असते. फॅन्सदेखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या पोस्ट बघण्यासाठी नेहमीच आतुर असतात. कलाकार म्हटले की, त्यांना अगदी दररोज वेगवेगळे फोटोशूट करावे लागते. आपल्या या फोटोशूटमधील निवडक फोटो ते नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. विविध हटके आणि आकर्षक लूक्समधील कलाकारांचे फोटो म्हणजे फॅन्ससाठी पर्वणीच असते.

आजच्या पिढीची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जान्हवी कपूरने देखील नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. जान्हवीने नुकतेच ‘एशिया मासिका’साठी ब्रायडल फोटोशूट केले आहे. याच फोटोशूटचे दोन निवडक फोटो तिने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहे. जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत आहे.

जान्हवीने पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिने सिल्वर रंगाचा तीन लाखांचा लेहेंगा घातला असून गळ्यात डायमंड सेट घातला आहे. या फोटोत तिने तिचे केस मोकळे सोडलेले दिसत आहे. या लूकमध्ये ती सिंपल मात्र लक्षवेधी दिसते. तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर फ्लॉवर प्रिंटचे जॅकेट घातलेले दिसत असून, ड्रेसवरही तिने डायमंड नेकलेस घातला आहे. या फोटोमध्ये तिची मादक नजर सर्वांनाच घायाळ करत आहे. तिच्या या फोटोंवर तिचे फॅन्स आणि कलाकार तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना अजिबात थकत नाही.

जान्हवी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते, नेहमी ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. सैराटच रिमेक असणाऱ्या ‘धडक’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज तिची तुलना इंडस्ट्रीच्या मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. जान्हवीचा ‘रुही’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यात तिने भुताने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. आगामी काळात ती ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जेरी’, ‘मिली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.