बॉलिवूड गाजवल्यानंतर आता अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘देवरा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी पहिल्यांदाच तेलुगु चित्रपटात काम करत आहेत. अशातच, देवरा या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान जान्हवी कपूरने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. तिनं (Janhvi Kapoor) स्वतःचीच लाज वाटते असं विधान केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.
जान्हवी ‘देवरा’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसोबत (Jr NTR) स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी पहिल्यांदाच तेलुगु चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. तेलुगू भाषामध्ये डायलॉग लिहिले असल्या ने जान्हवीला (Janhvi Kapoor) नीट बोलता येईना. यावेळी सेटवरील टीम तिला यामध्ये कशी मदत करते याचा खुलासा तिनं एका मुलाखतीत केला आहे.
एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली, ‘मी तेलुगू भाषा कधीच शिकले नाही आणि त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते. मी ते फोनेटेक्ली समजू शकते परंतु मी ते बोलू शकत नाही आणि ही माझी सर्वात मोठी खंत आहे. पण देवरा चित्रपटाची टीम खूप धीर देणारी आणि मदत करणारी आहे. मला अडचण येता सेटवरील लोक माझ्यासाठी धावून येतात. मला डायलॉग समजावून सांगतात. त्याबद्दल मी खूप आभारी आहे.
या चित्रपटामध्ये काम करता करता जान्हवीच्या हाती आणखी एक साऊथ चित्रपट लागला आहे. जान्हवी आता राम चरणच्या आगामी ‘आरसी 16’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात तिचे वडिल बोनी कपुर यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती.
जान्हवी कपूरचा पहिला तेलगू चित्रपट ‘देवरा’ १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘देवरा’ व्यतिरिक्त जान्हवी कपूरकडे ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘उलज’ सारखे चित्रपट आहेत. त्याचवेळी जान्हवी कपूर करण जोहरच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याची घोषणा नुकतीच झाली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर वरुण धवनसोबत दिसणार आहे.
‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात; विकी कौशिलसोबत आहे खास कनेक्शन?
Jaya Bachchan : ‘माझं ते स्वप्न अपूर्णच…’ वयाच्या ७५ व्या वर्षी जया बच्चन यांनी व्यक्त केली खंत