Saturday, June 29, 2024

फोटोग्राफर्सने बोनी कपूर यांना मास्क काढून पोझ द्यायला सांगताच, त्यांच्यावर भडकली जान्हवी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी कपूर तिच्या वडिलांची चांगली काळजी घेते आहे. अलीकडेच, जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांंच्याासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. जिथे ती तिच्या वडिलांची पूर्ण काळजी घेताना दिसली. जेव्हा पापाराजीनी बोनीला मास्क काढण्यासाठी आवाहन केले, तेव्हा जान्हवीने त्यांना ताबडतोब थांबवले आणि ‘चुकीचा सल्ला देऊ नका’ असे सांगितले.

नुकतीच जान्हवी कपूर वडील बोनी कपूरसोबत मुंबई विमानतळावर दिसली, तेव्हा अनेक पॅपराजींनी तिला घेरले आणि तिचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोणीतरी बोनी कपूर याना पोज देण्यासाठी त्यांचे मास्क काढण्यास सांगितले, बोनी यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि मास्क काढण्याचा प्रयत्न केला, पण जान्हवीने त्यांना मधेच थांबवले आणि लगेच मास्क घालायला सांगितले, तेव्हाच फोटोग्राफर म्हणाले “अरे काही होणार नाही.” यावर जान्हवीने पापाराजीना चुकीचा सल्ला न देण्याच्या सूचनाही दिल्या. जान्हवी म्हणाली की, “हे सुरक्षित नाही. कृपया असा चुकीचा सल्ला देऊ नका”, त्यानंतर दोघांनीही मास्क घालून पोझ दिल्या.

यानंतर, जेव्हा जान्हवी कारमध्ये प्रवेश करत होती, तेव्हा पुन्हा एकदा पापाराजीनी तिला अडवले आणि तिला तिचा टॅटू फ्लॉन्ट करण्यास सांगितले. यावर जान्हवी म्हणाली की, “तुम्ही खूप पाहिले आहे, आता मी ते इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहे. खरं तर, अलीकडेच जान्हवीने तिच्या हातावर एक टॅटू काढला आहे. तिची आई श्रीदेवीची आठवण करून देत आहे, ज्यामध्ये “आय लव्ह यू माय लब्बू” असे लिहिले आहे.

जान्हवीने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सुट्टीवरुन परतल्याचे दिसून येते. या फोटोंमध्ये जान्हवी तिच्या मैत्रिणींच्या गँगसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली. जान्हवी कपूर सध्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत निर्मित असलेल्या ‘दोस्ताना २’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती ‘गुड लक जेरी’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा