Saturday, November 22, 2025
Home बॉलीवूड ओहो! जान्हवी कपूरच्या हॉट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

ओहो! जान्हवी कपूरच्या हॉट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्या‌ प्रचंड असल्याकारणाने, तिचा कोणताही फोटो शेअर होताच सगळीकडे व्हायरल होत असतो. जान्हवी कपूरने नुकतेच मालदीवमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे फोटो शूट तिने समुद्रात केले आहे.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्विमिंगसूट मधील एक फोटो पोस्ट केला होता. तिच्या या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. हा फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परत एकदा तिच्या चाहत्यांना तिचा मालदीवमधला आणखी फोटो पाहायला मिळत आहेत.

हा फोटो बघून तर इंटरनेटचा पारा चढला आहे. तिचे सगळे फॅन्स भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तिने निऑन ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच एका साईडला केस रिकामे सोडले आहे. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तसेच समुद्रात देखील फोटो काढले आहे.

हे फोटो तिने वेस्तीन मालदीवमधील रिसॉर्टच्या ट्रॅव्हेल लेजर मॅगझिनसाठी मे महिन्याच्या कव्हरसाठी केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचे हे हॉट फोटो पाहून कोणीही स्वतःला कमेंट करण्यापासून थांबवू शकत नाही.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच तिच्या ‘गुड लक जेरी’ या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी जान्हवी ‘रूही’ या हॉरर चित्रपटात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा