Wednesday, June 26, 2024

जेव्हा दिग्दर्शकाने 16 वर्षांच्या जन्नतपुढे केलेली ‘ही’ गजब मागणी, झाला होता भलताच मोठा वाद

आपल्या साैंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या जन्नत जुबेर हिची साेशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलाेविंग आहे. जन्नत आपल्या ग्लॅमरस लूकने अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना टक्कर देते. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणारी जुबेर आज मुख्य अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करते, पण तुम्हाला माहित आहे का? की, शाे दरम्यान जन्नतचा प्रोड्यूसरसोबत असा वाद झाला हाेता की, ती चर्चेत आली हाेती.  

तर झाले असे की, जन्नत (jannat zubair) ‘तू आशिकी'(Tu Aashiqui ) या टिव्ही शाेमध्ये काम करत हाेती. या शाेमध्ये तिच्यासाेबत ऋत्विक अरोडा (Ritvik Arora )काम करत हाेता. शाेमध्ये दाेघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती. या शाेच्या शूटिंगदरम्यान एक सीन असा हाेता ज्यात जन्नतला आपल्या काे – स्टारला ऑनस्क्रिन किस करायचे हाेते आणि साेबतच काही इंटीमेट सीन करायचे हाेते. मात्र, जन्नतने हे करण्यास मनाई केली. त्यावेळी जन्नतचे वय केवळ 16 वर्ष हाेते, जेव्हा ही गाेष्ट जन्नतच्या आईला कळली तेव्हा त्यांनी प्राेड्यूसर साेबत या विषयावर बातचीत केली आणि म्हणाली, “जन्नत ऑनस्क्रीन किस किंवा इंटीमेंट सीन नाही करणार.”

माध्यमांतील वृत्तांनुसार निर्मात्यांनी जन्नतच्या ऐवजी दूसऱ्या अभिनेत्रीची या भूमिकेसाठी शाेध सुरु केला. मात्र, नंतर हे प्रकरण तिथेच संपले. याविषयावर बाेलताना जन्नतच्या आईने माध्यमाना सांगितले की, “जन्नतला इंटीमेट सीन करायला सांगितले हाेते. मात्र, आम्ही कम्फर्टेबल नसल्याने त्या सीनला अशाप्रकारे शुट केलं ज्याप्रकारे आम्हाला हवं हाेतं.”

तर जन्नत या विषयी म्हणाली, “मी भविष्यातही कधी इंटीमेट सीन्स करणार नाही. मी माझ्या या निर्णयावर ठाम आहे. मी हात कींवा कपाळावर किस करायला तयार आहे. पण काही गाेष्टी आहेत ज्या माझ्या वयानुसार ठीक नाही. आणि मी स्वत:देखील त्या सीनला घेऊन कम्फर्टेबल नाही.”

जन्नत पुढे म्हणाली, “खूप लाेक दडपणाखाली येतात कारण त्यांना निर्मात्यांशी वाद घालायचा नसताे. मात्र, मला असे वाटते तुम्ही अनकम्फर्टेबल असणार तर ताे सीन केला नाही पाहिजे. माझ्या करीता इज्जतच सर्व काही आहे. मग यासाठी मला शाे साेडावा लागला तरीही चालेल किंवा मला काम नाही भेटल तरी चालेल मला याचा काहीही फरक पडत नाही.”

जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘खतरों के खिलाडी 12 ’ (Khatron Ke Khiladi 12) या रियॅलिटी शोमधील दिसली हाेती. जन्नत आता लवकरच पंजाबी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’
मराठी चित्रपटाचा अटकेपार झेंडा! ‘फोर्ब्स’ने घेतली ‘पल्याड’ चित्रपटाची दखल

हे देखील वाचा