Wednesday, December 6, 2023

तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी १२’चा विजेता, ट्रॉफी कारसह मिळाली ‘एवढी’ रोख रक्कम

लोकप्रिय कार्यक्रम खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा12 सिजन नुकताच पार पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी (Rohit Shetty)करत होता. यामध्ये डांन्सर पासून ते टेलिव्हिजन कार्यक्रमातील सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग नुकताच झाला आहे आणि विजेत्याचे नाव घोषित केले आहे. चला तर जाणून घेऊया की, कोण आहे विजेता.

‘खतरो के खिलाडी 12′(khatron ke khiladi12) या कार्यक्रमाच्या फायनलिस्टमध्ये पाच स्पर्धक पोहोचले होते. मात्र, त्यांना टक्कर देऊन फैजल शेख उर्फ फैजु (Faisal Shaikh) आणि तुषार कालिया(Tushar Kalia) हे दोघेजन शेवटच्या सामन्यापर्यंत समोरा समोर होते. फिनालेमध्ये तुषार कालिया, जन्नत जुबैर(Jannat Zubair), फैसल शेख, मोहित मलिक(Mohit Malik), रुबीना दिलैक(Rubina Dilaik) आणि कनिका मान(Kanika Mann) या पाच स्पर्धकांनी आपली जागा बनवली होती. यापैकी पहिल्या स्टंटमध्ये जास्त वेळ लावल्यामुळे कनिका मान ही सगळ्यात आधी बाहेर पडली आणि त्यानंतर मोहित मलिकने रुबिनाला माघे सोडत स्टंटवर विजय मिळवला आणि फायनलिस्टमध्ये जागा मिळवली आणि रुबिना बाहेर झाली. यानंतर फैजु, जन्नत जुबैर आणि तुषार कालिया यांच्यांमध्ये दमदार स्पर्धा झाली. यावेळेस जन्नत जुबेरने स्टंट करण्यात जास्त वेळ घेतला त्यामुळे जन्नत खेळाच्या बाहेर झाली आणि फैजु आणि तुषार कालिया हे शेवटचे स्पर्धक ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

फैजु आणि तुषार यांच्यामध्ये खूपच दमदार पद्धतीने सामना झाला दोघेही खूपच संघर्षाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करत होते मात्र, तुषार कालिया याने फैजुला मात देऊन ‘खतरो के खिलाडी 12’ चा खिताब जिंकला. या कार्यक्रमामामध्ये जिंकल्यानंतर त्याला ट्रॅाफीसोबत 20 लाख रुपये आणि एक स्विफ्ट कार बक्षिस म्हणून भेटली आहे. या क्षणी तो एवढा खुश होता की त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरुनच दिसून येत होता.

कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन विजेता पदाची घोषणा केली आहे आणि सोशल मीडियावर ट्वीट करत चार फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये रोहित शेट्टी तुषारला ट्राॅफी देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तुषारचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. कलर्स टीव्हीने हे फोटो शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुषार कालिया याने खतरो के खिलाडीचे विजेतेपद आणि ट्रॉफी जिंकली आहे आणि कमेंडमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.”

‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्या क्षणी सर्कस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणवीर सिंग(Ranveer Singh) सोबत पुजा हेगडे(Pooja Hegde) आणि वरुन शर्मा(Varun Sharma) देखिल होते. त्यावेळी रणवीर सिंगने आपल्या हटके अंदाजामध्ये एंट्री केली होती आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
रोजंदारीवर काम करणारी वर्षा बुमराह ठरली ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ ची विजेती
एका पायजम्यामुळे चंकी पांडेला मिळाली होती चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा तो रंजक किस्सा
जेव्हा इंग्रजी न आल्यामुळे देव आनंद यांनी उडवली मधुबालाची खिल्ली, अभिनेत्रीने उचलले होते मोठे पाऊल

हे देखील वाचा