Friday, July 5, 2024

अजान, घुंघट बाबतची विवादित वक्तव्ये ते कंगनासोबत विवाद; वाचा ‘जावेद अख्तर’ यांचे गाजलेले वाद!

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक, गीतकार, शायर आणि कवी आहेत. जावेद साहब यांनी आजपर्यंत अनेक हिट सिनेमांचे सहलेखन केले अजून अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.

जावेद साहब यांना ‘जादू’ या टोपण नावाने देखील ओळखले जाते. जुने लोक त्यांना त्यांच्या कथांमुळे, शायरीमुळे, गीतांमुळे ओळखत होते, मात्र आजची नवीन पिढी त्यांना त्यांच्या वादांमुळेच जास्त ओळखते.

जावेद साहब हे खूप स्पष्टवक्ते आहे. ते त्यांची मतं खूप रोखठोकीने मांडतात. आज जावेद साहब त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या काही वादांबद्दल

अजानबद्दल त्यांचे व्यक्तव :

मुस्लिम लोकांच्या नमाज पडताना लाऊड स्पीकरवर लावल्या जाणाऱ्या अजान बद्दल एक विवादित ट्विट केले होते. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “भारतात सुमारे ५० वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणे हराम होते. मात्र कालांतरांनी ते हलाल झाले. इतकेच नाही तर अशाप्रकारे हलाल झाले की त्याची कोणताही सीमा राहिलेली नाही.

Javed Akhtar New
Javed Akhtar New

अजान करणे चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल,” त्यांच्या या ट्विटवर खूप वाद झाला. त्यांनी त्यांच्या ट्विटवर सफाई दिली मात्र त्यांना त्यांच्या या विधानाबद्दल कोणताच पश्चाताप नव्हता.

महिल्यांच्या डोक्यावर असणाऱ्या पदराबद्दलचे वक्तव्य :/ महिलांच्या घुंघटवर वक्तव्य :

जेव्हा देशात बुरखा घालण्यावर बंदी आणण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा जावेद साहब यांनी त्याचे मत मांडत सांगितले होते की, “जर बुरखा घालण्यावर प्रतिबंध येणार असतील तर महिलांच्या घुंघटवर देखील बंदी आली पाहिजे.

घुंघट ही प्रथा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. जे बुरखावर बंदी येणार असेल तर घुंघटला देखील विचारात घेतले पाहिजे. बुरखा आणि घुंघट यात फरक तरी काय आहे?” यावर करणी सेनेने खूप आक्षेप घेत त्यांना माफी मागायला लावली होती. मात्र त्यांनी माफी न मागता त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने समोर आणल्याचे सांगितले होते.

ताहिर हुसेन चा बचाव :

दिल्लीमध्ये हिंसाचार भडकावण्याच्या विरोधात पोलिसांनी आम आदमी पक्षच नेते ताहीर हुसेन यांच्यावर कारवाई केली होती. त्याबद्दल जावेद साहब यांनी ट्विट करत ताहीर यांचा बचाव करणायचा प्रयत्न केला होता.

जावेद साहब यांनी ट्विट करत लिहले होते की, “हिंसाचारात अनेकांचा मृत्य झालाय. अनेक जखमी झालेत. कित्येक घरे पेटवली गेली. दुकाने लुटली गेली, तर शेकडो विस्थापित झाले. पण पोलीस फक्त एकावर कारवाई करत आहे. त्याचे घर सील करताय. त्या घराच्या मालकाचा शोध सुरू आहे.

योगायोगाने त्याचे नाव ताहीरच आहे. दिल्ली पोलीस एकच गोष्ट घेऊन बसले. त्यांच्या या कामगिरीला सलाम.” यांनतर त्यांना खूप ट्रोल केले गेले, मात्र त्यांनी यावेळी देखील मला चुकीचे समजल्याचे सांगितले.

Javed Akhtar sahab
Javed Akhtar sahab

जावेद साहब आणि कंगना वाद :

कंगनाने जावेद अख्तर यांनी टोला त्यांच्या घरी बोलवत सांगितले होते की, हृतिक रोशन आणि राकेश रोशन ही मोठी माणसे आहेत. जर मी त्यांची माफी मागितली नाहीस तर माझ्या करिअरसाठी ते धोकादायक होऊ शकते तिला तुरुंगात टाकतील. तिचे आयुष्य बरबाद होईल आई मला आत्महत्याच करावी लागेल. अशा शब्दामध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकी दिली होती. त्यानंतर जावेद अख्तर या प्रकरणाविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.

तनिष्कच्या जाहिरातीवर वाद :

दिवाळीच्या मुहूर्तावर जावेद साहब यांनी तनिष्काच्या बंधुता वाढवणाऱ्या एक जाहिरातीवर वक्तव्य केले होते. नेहमी दोन धर्मांमध्ये लग्न झाले तर काहींना या लग्नात समस्या असताततच. खासकरून मुलीकडच्यांना, कारण त्यांना ती मुलगी संपत्ती वाटत असते, आणि तो मुलगा एक पशु किंवा चोर” यावरूनही त्यांना खूप ट्रोल केले गेले.

हनी ईरानी आणि जावेद अख्तर यांचा घटस्फोट :

जावेद यांचे पहिले लग्न हनी इराणींसोबत झाले होते. हनी या जावेद अख्तरपेक्षा दहा वर्षांनी लहान होत्या. हनी इराणी आणि जावेद अख्तर यांना दोन मुले आहेत. फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही त्यांची नावे आहेत.

सन १९७० च्या दरम्यान जावेद अख्तर कैफी आझमी यांच्याकडे लिखाणाचे धडे घ्यायला जायचे, तेव्हा त्यांचे मन कैफींची मुलगी असलेल्या शबाना आझमी हिच्यात गुंतले होते. काही दिवसांतच शबाना आणि जावेद अख्तर यांचे अफेअर सुरु झाले आणि लवकरच मीडियातही ही चर्चा रंगू लागली.

जावेद अख्तर यांचे शबाना आझमी यांच्यावर प्रेम होते, पण त्यांना मुलांना सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती. रोजच्या वादाला कंटाळून हनी यांनी जावेद यांना शबाना आझमींकडे जाण्याची परवानगी दिली. सोबतच मुलांची काळजी करु नका असेही सांगितले.

Javed Sahab
Javed Sahab

अखेर जावेद अख्तर यांनी हनी इराणी यांना घटस्फोट दिला आणि शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सलीम जावेद जोडी तुटली :

७०च्या दशकात पटकथा लेखकांचे नाव सिनेमांच्या पोस्टरवर लिहीले नाही. पण सलीम- जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एवढे यश मिळवले होते की, त्यांची नावे सिनेमाच्या पोस्टरवर मोठ्या अक्षरात झळकू लागली होती. १९८२ मध्ये सलीम- जावेद जोडी तुटली. या दोघांनी मिळून एकूण २४ सिनेमे एकत्र लिहिले. यातले २० सिनेमे सुपरहिट होते.

जावेद अख्तर यांना आतापर्यंत पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सलीम खान यांच्या मते ही जोडी तोडण्याचा निर्णय जावेद यांचाच होता.

हे देखील वाचा