Wednesday, February 21, 2024

कामाच्या शोधात मुंबईत आले होते जावेद अख्तर, मेहनतीने आणि चिकाटीने आज झालेत एक प्रसिद्ध गायक

जावेद अख्तर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक जेष्ठ गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात, वेगवेगळ्या विषयांवर ते आपल मत मांडत असतात. यामुळे अनेकदा मोठे वाद ही निर्माण झाले आहेत. आपल्या बहारदार आवाजाने त्यांनी गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. आज त्यांचा वाढदिवस जाणून घेऊ या त्यांच्या आयुष्याबद्दल…

जावेद अख्तर (javed akhtar) यांचा जन्म 17 जानेवारी 1945 ला मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांचं खरं नाव जादू असं आहे. त्यांची वडील ही हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध गायक होते, तसेच त्यांची आई सैफिया लेखक होत्या. लहानपणीच जावेद अख्तर यांना आपल्या आईला गमवावं लागलं. त्यांनतर त्यांच्या वडिलांनी दुसर लग्न केलं.

जावेद अख्तर हे चित्रपटात करियर करण्यासाठी म्हणून मुंबईला आले, ज्यावेळी ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात एक दमडीही नव्हती. चित्रपट क्षेत्रात काम मिळविण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. परंतु याच ठिकाणी त्यांना ‘सरहदी लुटेराच्या’ चित्रिकरणादरम्यान त्यांची भेट सलीम खान यांच्याशी झाली. आणि याच जोडगोळीने नंतर ‘शोले’ ‘बारात’ आणि ‘दिवार’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांच लेखन केल. दोघांनी तब्बल 24 चित्रपटांच्या कथा लिहिल्या होत्या. त्यामधील फक्त 4 कथा फ्लॉप ठरल्या. इतर 20 कथांनी त्या काळात हिंदी चित्रपट जगतात धुमाकूळ घातला. मात्र या दोघांच्या मैत्रीत फुट पडून ते वेगळे झाले.

जावेद अख्तर यांना लहानपणापासूनच लिखाणाचा छंद होता. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, लोक त्यांच्याकडून प्रेम पत्र लिहून घ्यायला यायचे. ज्यांना ते ओळखतही नसायचे. इतकी त्यांच्या प्रेमपत्र लिखाणाची शैली लोकांना आवडली होती.

‘सीता आणि गीता’ चित्रपटादरम्यान त्यांची भेट हनी इराणी यांच्याशी झाली हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षाच अंतर होत मात्र दोघांमध्ये प्रेम ही तितकंच होत. त्यांना जोया आणि फरहान नावाची दोन मुल ही झाली. परंतु त्यांचा हा विवाह कायमस्वरूपी टिकू शकला नाही. 1970 मध्ये त्यांची भेट कैफी आजमीची मुलगी शबाना आझमी यांच्याशी झाली आणि ते तिच्या प्रेमात पडले. मात्र त्यांच्या या प्रकरणाची कुणकुण त्यांच्या पत्नीला लागली होती त्यामुळे त्यांच्यात नियमित वाद होऊ लागले. शेवटी 6 वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर त्यांनी हनीला घटस्फोट देत शबाना आजमीशी विवाह केला.

त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मात्र असामान्य काम केल आहे. त्यामुळेच यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारतर्फे साहित्य अकादमी, पद्यश्री, पद्मभूषण सारखे अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.(javed akhtar birthday special lesser known facts about lyrist screenwriter)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

धक्कादायक! ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात, गंभीररित्या जखमी

हे देखील वाचा