Monday, July 1, 2024

‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

भारतीय मनोरंजनविश्वातील जेष्ठ आणि प्रतिभावान गीतकार असणारे जावेद अख्तर हे त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा जावेद यांच्या व्यक्तव्यावरून त्यांना मोठ्या वादांचा आणि ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. मात्र तरीही ते त्यांचे मतं व्यक्त करत असतात. नुकतेच ते पाकिस्तानमध्ये जाऊन आले. तिथे त्यांनी जे काही केले त्याची कोणलाही अपेक्षा नसेल. ते पाकिस्तानमध्ये जाऊन जे बोलून आले आहेत, सध्या त्याची चांगलीच चर्चा होत असून, त्यांचे कौतुक देखील होत आहे. 

जावेद अख्तर नुकतेच लाहोर येथे फैज फिल्म फेस्टिव्हलसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या कारामतींचा एक आरसाच दाखवला. ते म्हणाले की, मुंबईमध्ये जो २६/११ चा हल्ला झाला, त्याचे हल्लेखोर पाकिस्तानमध्ये फिरत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच ऐकवणे मोठी बाब आहे आणि हे काम अख्तर साहेब करून आले. ते म्हणाले, “आम्ही भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेह अली खानसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले, पण आजवर कधीच पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. तर आता मुख्य बाब हीच आहे की आपण एक दुसऱ्यावर आरोप करणे बंद केले पाहिजे. यामुळे काहीही साध्य होणार नाही.”

पुढे जावेद अख्तर म्हणाले, “आम्ही तर मुंबईचे लोकं आहोत. आम्ही पाहिले मुंबईवर कसा हल्ला झाला ते. ते लोकं नॉर्वे, इजिप्तमधून नव्हते आले. ते अजूनही तुमच्या देशात फिरत आहे. जर ही तक्रार कोणत्याही भारतीय व्यक्तीच्या मनात आहे, तर तुम्हाला त्याचा राग येता कामा नये.” त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वानीच जावेद अख्तर यांचे कौतुक केले असून, पाकिस्तानला आणि तेथील लोकांना यावर उत्तर देण्याचे सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
viral video sonu nigam : धक्कादायक! मुंबईत म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झाला हल्ला
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य

हे देखील वाचा