Saturday, July 27, 2024

देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य

सन 1989 साली प्रदर्शित झालेला चित्रपट केवळ श्रीदेवीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट नाही. तर दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठीही हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटाने यश चोप्रांचे प्रॉडक्शन हाऊस बुडता बुडता वाचले होते. श्रीदेवी, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर या कलाकारांना घेऊन बनवलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पण तुम्हाला माहित आहे का की यश चोप्रांनी हा चित्रपट कसा बनवला याची रंजक गोष्ट आहे. अभिनेत्री श्रीदेवी देवदूताच्या रुपात आली अन एका निर्णयाने निर्माता यश चोप्रा यांचे आयुष्य बदलले.

बॉलीवूडमध्ये 80 चे दशक आव्हानांनी भरलेले होते. या काळात यशराज चोप्रा (Yash Chopra) यांच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांनाही यशाबद्दल आश्चर्य वाटले. या काळात यश चोप्रां यांना एकापाठोपाठ अपयश आले. ‘विजय’ हा मल्टीस्टारर चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. सर्वोत्कृष्ट कथांच्या मागे धावणाऱ्या यश चोप्रा यांनी त्यांचे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांचे प्रोडक्शन हाऊस बुडण्याच्या मार्गावर होते. पण याच काळात यश चोप्रा श्रीदेवीला भेटले. श्रीदेवीच्या (sridevi) एका निर्णयामुळे यश चोप्रा यांचे बुडण्याच्या मार्गावर असलेले प्रोडक्शन हाऊस तर वाचलेच पण, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात चमकदार चित्रपटांची नोंदही झाली.

यशराजची बुडती निर्मिती श्रीदेवीने वाचवली
नुकतीच नेटफ्लिक्सने ‘द रोमॅंटिक्स’ ही मालिका रिलीज केली आहे. या मालिकेत चित्रपट निर्मात्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या निर्मितीची कथा शेअर केली होती. या मालिकेत यश चोप्रा यांनी त्यांच्या चित्रपटांबाबत अनेक खुलासे केले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, श्रीदेवीच्या एका निर्णयाने त्यांचे प्रॉडक्शन हाऊस बुडता बुडता वाचले होते.

हे वर्ष होते 1989. या वर्षी चांदनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. श्रीदेवी, ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि विनोद खन्ना (vinod khanna) या कलाकारांना घेऊन बनवलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर सुपरहिट ठरलाच पण, चित्रपटाची गाणी आणि कथेचेही खूप कौतुक झाले होते. यशराज फिल्म्स प्रोडक्शन हाऊसला जीवनदान मिळाले. त्यांनी सांगितले होते की, चांदनीपूर्वी ते अनेक समस्यांमधून जात होते. त्याआधी त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यानंतर त्यांनी गाण्यांसह व्यावसायिक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

चित्रपट फ्लॉप झाला असता तर निर्मिती थांबली असती.
या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, त्यांचे प्रोडक्शन हाऊस खूप अडचणीतून जात होते. यानंतरही त्यांनी ‘चांदनी’ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बजेट खूपच कमी होते. प्रॉडक्शन हाऊस तोट्यात चालले होते. त्यानंतर बँकेकडून ओव्हरड्राफ्ट घेऊन त्यांनी चांदनी हा चित्रपट बनवला. सुदैवाने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यश ते म्हणाले होते की, जर हा चित्रपट फ्लॉप ठरला असता तर त्यांचे प्रोडक्शन हाऊस कायमचे बंद झाले असते. (actress sridevi made producer yash chopra life and career chandni movie)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नुतन पुण्यतिथी: वयाच्या १४ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात; अफेअरची बातमी वाचून लगावली होती अभिनेत्याच्या कानाखाली
‘पैसा असेल तर…’ सलमान अन् अक्षयच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर युजर्सच्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा