Wednesday, June 26, 2024

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, रिलीज आधीच कमवले ‘एवढे’ कोटी

शाहरुख खानचे (shahrukh khan)चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाचा टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना खूश केले आहे. त्याचवेळी, या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आनंदाने उड्या मारतील. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोटींचा व्यवसाय केला आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की निर्मात्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला विकले आहेत. म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळाने शाहरुख खानचा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकर्स आणि OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स यांच्यात सुमारे १२० कोटी रुपयांची डील झाली आहे.

शाहरुख खानचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो संपूर्ण भारत स्तरावर प्रदर्शित होत आहे, ज्याची निर्मिती अभिनेत्याची पत्नी गौरी खान करत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, “जवान ही एक सार्वत्रिक कथा आहे जी भाषा, भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे आहे. हा चित्रपट सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा चित्रपट बनवण्याचे श्रेय अॅटलीला जाते, हा माझ्यासाठीही एक चांगला अनुभव आहे कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात. पुढे काय होणार आहे याची झलक या टीझरमधून पाहायला मिळते.

अॅटली शाहरुख खान स्टारर जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि हा चित्रपट २ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा