अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan)या नेहमीच त्यांच्या स्पष्टव्यक्त स्वभामुळे चर्चेत असतात. त्या अभिनेत्री असण्यासोबतच एक खासदार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान जया बच्चन यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी चित्रपट उद्योगाबद्दलही प्रश्न विचारले आणि उत्तरे मागितली.
जया बच्चन म्हणाल्या, “मी भारतीय मनोरंजन उद्योगाची सदस्य आहे. हा उद्योग केवळ अर्थव्यवस्थेत योगदान देत नाही तर सर्वाधिक कर भरणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. शिवाय, या उद्योगातील लोक जगभरात भारतीय संस्कृतीचा प्रचार करतात. या योगदानानंतरही, मनोरंजन उद्योग जागतिक स्तरावर सर्वाधिक जीएसटी आणि इतर करांच्या अधीन आहे.”
या नंतर त्यांनी विचारले की, “या अर्थसंकल्पात मनोरंजन उद्योगाचा विकास करण्यासाठी आणि करांचा बोजा कमी करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे? जर असे झाले नाही, तर आपण केवळ भारतच नाही तर जगभरातील चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यास सुरुवात करू. कारण आजकाल भारतीय चित्रपट उद्योग अत्यंत अडचणीत आहे. लोकांसाठी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे कठीण होत चालले आहे, मग ते ओटीटी प्रकल्प असोत किंवा सिनेमा प्रकल्प.” जया बच्चन म्हणाल्या, “मी गेल्या वर्षीही हेच म्हटले होते. यावेळीही मी तेच म्हणतेय. मला आशा आहे की माझे ऐकले जाईल.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सैफ अली खानचा हा दागिना इतका महाग कि, लक्झरी कारची किंमत ही पडेल फिकी










