Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड जरा इकडे पाहा! पॅपाराझींनवर रागवण्याबाबत जया बच्चननं तोडलं मौन, नात नव्याही कारण जाणून थक्क

जरा इकडे पाहा! पॅपाराझींनवर रागवण्याबाबत जया बच्चननं तोडलं मौन, नात नव्याही कारण जाणून थक्क

अभिनेत्री जया बच्चन या चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. माध्यमांसोबतच्या त्याच्या वाईट वागणुकीचे व्हिडिओ अनेकदा चांगलेच व्हायरल होतात. त्यामुळे त्यांना ट्रोलही व्हावे लागते. बहुतेकदा त्या मीडिया फोटोग्राफर्सवर राग काढताना दिसतात. पार्टी असो , कार्यक्रम किंवा विमानतळ, जया बच्चन अनेकदा फोटोग्राफर्सवर चिडताना दिसतात. नुकतेच जया यांनी या वागणुकीमागचे कारण सांगितले आहे.

पॅपराझींच्या वाईट वागण्यामागचे कारण जया बच्चन (jaya bachchan) यांनी नुकतेच उघड केले आहे. फाेटाेग्नाफर्सला पाहून त्या अशा का वागतात हे त्यांनी त्यांची नात नव्याच्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’मध्ये सांगितले आहे. जया म्हणाल्या की, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी ढवळाढवळ केली तर मला अजिबात आवडत नाही.” मुद्दा पुढे करत जया म्हणाल्या, “मला असे लोक आवडत नाहीत जे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारतात आणि खोटे बोलून पोट भरतात. म्हणूनच मी त्यांना नेहमी म्हणते की, तुम्हांला लाज वाटली पाहिजे.”

नव्याने जया यांना विचारले की, “जेव्हा तुम्ही अभिनेत्री बनल्या तेव्हा तुम्हाला माहित नव्हते का की, असे काही होईल? याला उत्तर देताना जया म्हणाल्या, “नाही, मी असा कधी विचारही केला नाही. ही आजची गोष्ट आहे असे नाही, मी सुरुवातीपासूनच अशी होते. खरे सांगायचे तर माझ्या कामाबद्दल बोला. मला सांगा की, मी खूप वाईट अभिनेत्री आहे आणि मी वाईट चित्रपट केले आहेत किंवा मी चांगली दिसत नाही, मग या गोष्टींनी मला फरक पडत नाही. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी ढवळाढवळ केली तर मला ते अजिबात आवडत नाही.”

माध्यमांतील वृत्तानुसार, जया ट्रोल करणाऱ्यांवरही बोलली आणि म्हणाली, “युट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर माझे संतप्त फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून लोकांनी पैसे कमवले तर मला ते अजिबात आवडणार नाही. तुम्ही माझ्या चित्रपटांबद्दल, माझ्या राजकारणाबद्दल माझ्यावर भाष्य करा, मला काही फरक पडत नाही, पण मी वैयक्तिक चारित्र्य अजिबात सहन करणार नाही. मी कुठेतरी जात असताना तुम्ही मला मध्येच थांबवून माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केले तर मला राग येणार नाही का?, मी माणूस नाही का?”

काही काळापूर्वी जया आणि नव्या एकत्र दिसल्या होत्या. यादरम्यान जया यांनी फाेटाेग्नाफर्सला त्यांचे फोटो क्लिक करण्यापूर्वी विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही मीडियाचे आहात का? तुम्ही कोणत्या माध्यमातील आहात? जया बच्चनचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि तिला यावर खूप ट्रोलही करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅप्टन शिव ठाकरेच न ऐकल्याने बिग बाॅस भडकले, प्रियांकाला झाली शिक्षा, पाहा व्हायरल व्हिडिओ

महानायकांच्या लेकीचा खुलासा! भाऊ अभिषेकबद्दल कुणी तोंडातून ‘अ’ जरी काढला, तरी चढतो पारा

हे देखील वाचा