Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड महानायकांच्या लेकीचा खुलासा! भाऊ अभिषेकबद्दल कुणी तोंडातून ‘अ’ जरी काढला, तरी चढतो पारा

महानायकांच्या लेकीचा खुलासा! भाऊ अभिषेकबद्दल कुणी तोंडातून ‘अ’ जरी काढला, तरी चढतो पारा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले आहे. नव्याचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या‘ तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या शोमध्ये आतापर्यंत बच्चन कुटुंबाच्या अनेक न ऐकलेल्या स्टाेरी सांगितल्या गेल्या आहेत. पण यावेळी जे गोष्ट समोर आली आहे, त्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होऊ शकते.

नुकत्याच शूट केलेल्या एपिसोडमध्ये, श्वेता बच्चन (shweta bachchan) हिने खुलासा केला की, तिच्या वडिलांबद्दल कोणी काही बोलले तरी तिला काही फरक पडत नाही. तिला त्याबद्दल वाईट देखील वाटत नाही. मात्र, भाऊ अभिषेक (abhishek bachchan) याला ट्रोल केल्याबद्दल तिला खूप वाईट वाटते.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

नवीन नंदासोबतच्या पॉडकास्ट शोमध्ये झालेल्या संवादादरम्यान श्वेता म्हणाली की, “लोक अनेकदा अभिषेक बच्चनची तुलना अमिताभ बच्चनसोबत करतात, जे योग्य नाही. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, कोणत्याही दोन भिन्न व्यक्तींना समान करता येणार नाही.”

श्वेता म्हणाली की, “जेव्हा टीका होते तेव्हा मला फार वाईट वाटते. तो माझा धाकटा भाऊ आहे. मी मोठी बहीण म्हणून अभिषेकची नेहमीच काळजी घेतली आहे. अशा स्थितीत त्यांचे काही वाईट झाले की, मला खूप दु:ख हाेते.” श्वेताने नव्याला सांगितले की, ‘जेव्हा तिच्या आजोबांचा (अमिताभ बच्चन) संबंध येतो तेव्हा तिला काही हरकत नाही, पण तिच्या मुलीच्या मामाबद्दल (अभिषेक बच्चन) बद्दल काही बोलले तर, ती सहन करू शकत नाही.’ श्वेता म्हणाली की, “एखाद्याची तुलना कोणाशी कशी होऊ शकते. एखाद्याचे यश दुसऱ्याच्या यशाने मोजता येत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

श्वेता म्हणाली की, “अभिषेकला 10 पैकी 8 मार्क्स मिळाले तर ट्रोलर म्हणतील की, अमिताभ बच्चनला पूर्ण मार्क्स मिळाले, मग मुलगा कसा मागे राहिला. जर अभिषेकची कामगिरी वडील अमिताभ यांच्यापेक्षा कमी असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की, त्याच्यात प्रतिभेची कमतरता आहे. शोमध्ये श्वेताने हेही उघड केले की, अभिषेक जवळपास दोन दशकांपासून या सगळ्याचा सामना करत आहे.”

अभिषेक विषयी बाेलायचे झाले, तर ताे अखेरचा तुषार जलोटा दिग्दर्शित ‘दसवीं’ चित्रपटात गंगाराम चौधरी नावाच्या राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसला हाेता, ज्यामध्ये त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात जावे लागते. या चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्या पत्नीची भूमिका निम्रत कौरने साकारली आहे. तर यामी गौतमने जेलरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हाेता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
एकतावर कोसळलं संकटांचा डोंगर, तीन महिन्यांपासून जवळचा व्यक्ती दूर, सरकारकडे केली मदतीची याचना

अय्याे! कॅटरिनानं ढसाढसा रडून व्यक्त केलं दु:ख; म्हणाली, ‘सर्व म्हणत हाेते मी …’

हे देखील वाचा