Sunday, June 4, 2023

‘बाकीच्यांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही..’ टिव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने प्रेमप्रकरणावरुन केले स्पष्ट वक्तव्य

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट ‘रिद्धिमा’, ‘कुमुद’, ‘माया’ आणि ‘झोया’च्या या भूमिकांंमुळे घराघरात लोकप्रिय झाली होती. सध्या ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिज ‘कोड एम सीझन 2’मुळे चर्चेत आहे. या सीरिजमुलेती तिचा सहकलाकार तनुज विरवानीसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, तिने आपल्या आणि तनुजच्या नात्याबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. जेनिफर विंगेटने नुकतीच तिची वेब सीरिज ‘कोड एम सीझन 2’ मध्ये तिचा सह-अभिनेता विरवानीबद्दल स्पष्टिकरण दिले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ.

जेनिफर विंगेट ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिचा सहकलाकार तनुजसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. याबद्दल पहिल्यांदाच तिने आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी ती म्हणाली की ” मी एक व्यक्तिमत्व आहे आणि लोकांचे माझ्याबद्दल मत असेल आणि ते ठीक आहे. जोपर्यंत तो माझ्या कामाचा आणि मर्यांदाचा आदर करतो तोपर्यंत मी ठीक आहे. मी समजते की हा माझ्या कामाचा एक भाग आहे. त्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही,”

को-स्टार तनुजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना जेनिफर म्हणाली की, “सीझन 1 पासून आमचे बाँडिंग अधिक घट्ट झाले आहे. त्याच्या आजूबाजूला असणं खूप छान वाटतं, कारण तो नेहमी आनंदी असतो. जेनिफर विंगेट पुढे म्हणाली की, “सेटवर तिच्यासोबत कधीही वाईट क्षण आलेला नाही, कारण मी नेहमी तिच्यासोबत हसायचे आणि मला हसायला आवडते. दरम्यान जेनिफरने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या पांढर्‍या-थीम असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी माझ्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत राहण्यासाठी आणि पूर्वीप्रमाणेच माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप उत्सुक होते. गेली दोन वर्षे प्रत्येक वाढदिवसाला मी माझ्या घरी एकटाच बसायचे किंवा झूम कॉलवर त्याच्याशी बोलायचे. असा खुलासा तिने केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा