Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘त्या’ छोट्याशा चुकीमुळे सहकलाकाराला मारायला धावली होती जेनिफर विंगेट, वाचा रंजक किस्सा

जेनिफर विंगेटची (Jenifer Vinget) गणना टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते, ही अभिनेत्री अलीकडेच कोड M2 मध्ये दिसली होती. जेनिफरची ही वेब सिरीज चाहत्यांना खूप आवडली. आपल्या सौंदर्याने सगळ्यांना वेड लावणाऱ्या जेनिफर विंगेटला खऱ्या आयुष्यात एक गोष्ट अजिबात आवडत नाही आणि ती काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? वेलचीच्या वासाने जेनिफर अस्वस्थ होते. याच्याशी संबंधित एक मजेदार किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजेच, वेलचीमुळे जेनिफर एका अभिनेत्याला मारणार होती. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

मनोरंजन जगतातील कलाकारांचे अनेक किस्से माध्यमांमध्ये ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर विंगेटबद्दल सांगितला जातो. तो किस्सा म्हणजे जेनिफर विंगेटला वेलचीचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळेच ती एका अभिनेत्याला मारणार होती. तो अभिनेता म्हणजेच कुशाल टंडन. कुशाल टंडन आणि जेनिफर विंगेट टीव्ही शो बेहदमध्ये एकत्र दिसले होते. या कार्यक्रमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली होती.

जेनिफरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, कुशलला माहित आहे की तिला वेलचीचा वास अजिबात आवडत नाही. तरीही एकदा जेनिफर आणि कुशलचे भांडण झाले तेव्हा त्याने मुद्दाम तिच्या वेलची खायला सुरुवात केली. मुलाखतीदरम्यान जेनिफरने असेही सांगितले होते की, इलाचलीचा वास इतका तीव्र होता की मला आता कुशलला मारावेसे वाटले होते. तिचा हा किस्सा ऐकून सगळेच चकित झाले होते.

दरम्यान जेनिफरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, जेनिफर विंगेट शेवटची टीव्हीवर बेहद २ मध्ये दिसली होती. काही काळासाठी जेनिफरने तिचे लक्ष ओटीटीकडे वळवले आहे. या मुलाखतीदरम्यान जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटावरही मोकळेपणाने बोलली. घटस्फोटानंतर त्यांची अवस्था कशी झाली होती हे तिने सांगितले होते.

हेही वाचा –

ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड

‘माझी सेक्स लाईफ खूप…’ करण जोहरच्या शोमध्ये न जाण्याचे तापसी पन्नूने सांगितले विचित्र कारण

शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा