Friday, April 19, 2024

‘माझी सेक्स लाईफ खूप…’ करण जोहरच्या शोमध्ये न जाण्याचे तापसी पन्नूने सांगितले विचित्र कारण

बॉलिवूड (Bollywood) आणि टॉलिवूड (Tollywood) अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते. लोक देखील तिला जोरदार ट्रोल करत असतात. परंतु तिच्या वक्तव्याने ती सगळ्यांची बोलती बंद करत असते. अशातच तिने ‘कॉफी विद करण‘ (koffe with karan)या शोमध्ये सहभागी न होण्यामागील कारण सांगितले आहे. सध्या ती तिच्या दोबारा या चित्रपटामुळे जास्त व्यक्त आहे. यासाठी ती आता एका इव्हेंटमध्ये पोहचली. त्यावेळी तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आले. आता तिने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने करण जोहर होस्ट केलेल्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये ती का नाही हे मीडियाला सांगितले. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या तापसीच्या शेजारी असलेल्या खोलीत करण जोहर त्याच्या चॅट शोचे प्रमोशन करत होता. त्याची दखल घेत मीडियाने तापसीला विचारले की तिला करणच्या शोमध्ये का बोलावण्यात आले नाही?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “तिचे लैंगिक जीवन तिला ‘कॉफी विथ करण’साठी आमंत्रित करण्याइतके मनोरंजक नाही”. अभिनेत्री तापसी तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. हा प्रश्न तिने तितक्याच हुशारीने हाताळला. ‘कॉफी विथ करण’च्या नवीन सीझनमध्ये बहुतेक पाहुणे लैंगिक जीवनाबद्दल बोलताना दिसले म्हणून त्यांची कमेंट ऑन पॉइंट होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

त्यामुळेच तापसीने गंमतीने सांगितले की, तिच्या सेक्स लाईफबद्दल शोमध्ये बोलणे फारसे मनोरंजक नाही. सध्या तापसी तिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तापसी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

‘मनमर्जियां’नंतर अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू ‘दोबारा’मध्ये पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शोभा कपूर आणि एकता कपूरच्या कल्ट मूव्हीज निर्मित, बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

‘कॉफी विथ करण ७’ बद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत करीना कपूर,(kareena kapoor) आमिर खान,(aamir khan) विजय देवरकोंडा,(vijay devarkonda)  अनन्या पांडे, अक्षय कुमार,(Akshay kumar) समंथा रूथ प्रभू, (samntha ruth prabhu) आलिया भट्ट,(Alia bhatt) रणवीर सिंग, (Ranveer singh) सारा अली खान आणि जान्हवी कपूर (Janhavi kapoor) या शोमध्ये दिसले आहेत. या शोचे अनेक भागही वादात सापडले आहेत, त्यापैकी एका भागामध्ये करण जोहरने थेट दक्षिणेतील स्टार विजय देवरकोंडा यांना शेवटचा सेक्स कधी केला असा प्रश्न विचारला होता. अनन्या पांडे विजयच्या वतीने या प्रश्नाचे उत्तर देताना दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, व्हायरल फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

बाप रे ! अजगर गळ्यात घालून नोरा फतेहीचा भयान व्हिडिओ व्हायरल

आर्या वाळवेकर ठरली अमेरिकेतली सर्वात सुंदर तरुणी, सोलापूर जिल्ह्याशी आहे खास कनेक्शन

 

 

हे देखील वाचा