Sunday, January 26, 2025
Home बॉलीवूड शाहिद कपूर-मृणाल ठाकूरची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे जर्सी सिनेमातील ‘माइया मैनु’ गाणे प्रदर्शित

शाहिद कपूर-मृणाल ठाकूरची रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारे जर्सी सिनेमातील ‘माइया मैनु’ गाणे प्रदर्शित

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर अभिनित ‘जर्सी’ या चित्रपटातील ‘माइया मैनु’ (Maiyya Mainu Song) हे दुसरे गाणे लाँच झाले आहे. या गाण्यात शाहिद आणि मृणाल यांच्यात रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून दोघांचा प्रेमकहाणी ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. गाण्यात दोघांमध्ये क्यूट रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहे. या गाण्यामध्ये पंकज कपूरची झलकही दिसली. गाण्याचे बोल अतिशय श्रवणीय असून, संगीतही खूप छान आहे.

‘माइया मैनु’ हे गाणे सचेत टंडनने गायले असून, त्याचे संगीत सचेत-परंपरा यांनी दिले आहे. तर गाण्याचे बोल शेले यांनी लिहिले आहेत. हे गाणे शेअर करताना शाहिद कपूरने लिहिले, “माइया मैनु आमचे लिरिकल लव्हलेटर आता प्रदर्शित झाले आहे.” हे गाणे शेअर करताना मृणाल ठाकूरने लिहिले, “विद्या> समोसा, प्रत्येक वेळी त्याची उपस्थिती जाणवणारे प्रेम, ‘माइया मैनु’ प्रदर्शित झाले आहे.”

शाहिदचे चाहते त्याच्या आगामी ‘जर्सी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होत असून, या चित्रपटात त्याने एका क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला आणि तो चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरला आहे. शाहिद व्यतिरिक्त त्याचे वडील पंकज कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘जर्सी’ ३१ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

याआधी या चित्रपटातील ‘मेहरम’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडले. ‘मेहरम’ गाण्याची सुरुवात “यंगस्टर्स को चांस देंगे तो उनका करियर बनेगा. उन्हें इंडिया के लिए खेलने का मौका मिलेगा. वह सिर्फ ३६ साल का है यार…” या संवादाने होते. २ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या गाण्याला १ लाख ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हे गाणे देखील संचेत टंडनने गायले आहे. गाणे तयार करण्यापासून ते निर्मितीपर्यंतची जबाबदारी संचेत-परंपरेने सांभाळली होती.

हे गाणे चाहत्यांना खूप आवडत आहे. कमेंट करून ते गाण्यावरचे प्रेम व्यक्तसुद्धा करत आहेत. ‘जर्सी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना शाहिदच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळाली असून, त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. गायक संचेत टंडनने पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. चाहते याला गाणे नाही, तर भावना म्हणत आहेत.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा