तारक मेहता का उलट चष्मा या मालिकेने मागील १४ वर्षांपासून आपले मोठे गरुड प्रेक्षकांच्या मनावर घातले आहे. आपल्या विनोदी अंदाजाने ही मालिका नेहमीच सर्वांचे मनोरंजन करत असते. आज जरी मालिकेबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात असल्या तरी देखील लोकांचे मालिकेबद्दलचे प्रेम अजिबातच कमी झालेले नाही. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी अर्थात जेठालाल गडा. दिलीप यांना या मालिकेने नेम, फेम, मनी सर्वच गोष्टी दिल्या. त्यांना एक नवीन ओळख दिली. अतिशय कष्टाने आणि संघर्षाने त्यांनी हे यश मिळवले.
या मालिकेतून त्यांनी अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र या मालिकेत दिसण्याआधी त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मैने प्यार कियापासून ते हम आपके हैं कौन?, दिल हैं तुम्हारा आदी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लहान मोठ्या भूमिका केल्या. आजच्या काळात ओटीटी हे खूपच महत्वाचे आणि मनोरंजनाचे उत्तम माध्यम म्हणून ओळखले जात असून खूपच कमी काळात या माध्यमाने लोकांना चांगलेच वेड लावले आहे.
View this post on Instagram
अनेक फ्लॉप कलाकरांसोबतच अनेक सुपरस्टार देखील या माध्यमावर दिसत आहे. अशातच दिलीप जोशी कधी ओटीटीवर येणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांना या माध्यमात पाहायची अनेकांची इच्छा देखील असेल. मात्र खुद्द दिलीप यांना या माध्यमामध्ये काम करायचे नाही. एका मुलाखतीमध्ये त्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
दिलीप जोशी यांनी सांगितले, “मला जेव्हा तारक मेहता ऑफर झाला तेव्हा मला वाटले नव्हते हा शो एवढा चालेल. मला एवढी लोकप्रियता मिळेल. आज ओटीटीवर खूपच चांगला कंटेंट आहे. मला पण चांगला मिळाला तर बरेच आहे. मात्र या माध्यमात विनाकारण खूप शिवीगाळ दाखवली जाते. माझ्याकडून शिवीगाळ अजिबातच होणार नाही. माहित नाही निर्माते हे असे कसे करू शकता.”
पुढे दिलीप जोशी यांनी सांगितले, “मला एक शो देखील ऑफर झाला होता, मात्र त्यात खूपच जास्त शिवीगाळ असल्यामुळे मी त्याला नकार दिला. असे अनेक शो आहेत, ज्यात खूपच खालच्या पातळीच्या शिव्यांचा वापर केला गेला आहे. मला माहित नाही असे का केले जाते. मला कॉमेडी सर्कस देखील ऑफर झाला होता. मात्र अश्लील जोक्समुळे मी नकार दिला. मला असे काही करायचे जे पाहताना मी परिवारासोबत असलो तरी काहीही फरक पडणार नाही.”
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-