‘सैराट’ फेम प्रिन्स बाबा आला गोत्यात, अभिनेता सुरज पवारला ‘या’ गंभीर गुन्ह्यात होणार अटक?

0
192
suraj pawar fandry
Photo Courtesy: Instagram

लोकप्रिय मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळेच या चित्रपटातील कलाकारांची आजही चर्चा होताना दिसत असते.  चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सुरज पवार या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. यापैकी अभिनेता सुरज पवारबद्दल एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता सुरज पवारने सैराट चित्रपटात आर्चीच्या भावाची म्हणजेच प्रिन्स बाबाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या या डॅशिंग भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याचबरोबर त्याला या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मात्र सध्या सुरज पवार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका फसवणुकीच्या प्रकरणात सुरज पवारचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून पाच लाख रुपयांची मागणी संशयितांकडून कऱण्यात आली होती. या प्रकरणात नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तीन संशयितांना अटक करण्यात आली.  दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ),आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या तपासणीत अभिनेता सुरज पवारचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळेच सुरज पवारलाही अटक होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान अभिनेता सुरज पवारने ‘पिस्तुल्या’, ‘फॅंन्ड्री’, ‘सैराट’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुरजच्या अटकेच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – बॉयकॉट करुनही सुपरहीट, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बॉयकॉटची चिंता आम्हाला…’
विकीच्या वडिलांनी उंचावली खानदानाची मान! नॉर्वेत ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने झाला सन्मान
‘या’ स्पर्धकाने स्टेजवर काढली वडिलांची आठवण, भावूक होताच आईने दिला आधार; माधुरीच्याही डोळ्यात अश्रू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here