‘झलक दिखला जा 10’ हा सेलिब्रिटी डान्स रिअलिटी शो पाच वर्षांनंतर सुरू झाला आहे. अशा स्थितीत प्रेक्षकांमध्ये त्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या शोमध्ये प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळेसही प्रसिद्ध सेलिब्रिटींची स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे. जज प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर, ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि डान्सिंग क्वीन नोरा फतेही यांच्यासह बी-टाउन स्टार्सनाही मार्गदर्शन करत आहेत. त्याच वेळी, सर्वात लोकप्रिय होस्टपैकी एक, मनीष पॉल होस्टिंग करताना दिसत आहे. मात्र सध्या कार्यक्रमातील माधुरी दीक्षितच्या डान्सचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
झलकच्या मंचावर निया शर्मा, शिल्पा शिंदे, पारस कालनावत, नीती टेलर, गश्मीर महाजन आणि अमृता खानविलकर यांसारख्या सेलिब्रिटीज आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. ‘कुंडली भाग्य’ फेम धीरज धूपर देखील या शोचा एक भाग होता, परंतु तब्येतीच्या समस्येमुळे त्याने शो सोडला. ‘झलक दिखला जा 10’ चा नवीन प्रोमो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर माधुरी दीक्षितच्या ‘डोला रे डोला’ (देवदास) या 20 वर्ष जुन्या आयकॉनिक गाण्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित अमृता खानविलकरसोबत ‘डोला रे डोला’वर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसली. वास्तविक, स्टेजवर अमृताने तिच्या कोरिओग्राफरसोबत ‘डोला रे डोला’ गाणे सादर केले. तिचा हा परफॉर्मन्स पाहून माधुरीही स्वत:ला पाय रोखू शकली नाही. ती अमृतासोबत डान्स करायला लागली, जे पाहून रोहित शेट्टी, नोरा फतेही आणि करण जोहर आश्चर्यचकित झाले.
View this post on Instagram
दरम्यान माधुरी दीक्षितने ‘देवदास’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनसोबत ‘डोला रे डोला’वर डान्स केला होता. तिचे नृत्य आजही खूप लोकप्रिय आहे. एकेकाळी मुली अनेक प्लॅटफॉर्मवर या गाण्यावर आणि डान्स मूव्हीजवर परफॉर्म करत असत. या गाण्याला 20 वर्षे झाली असली तरी माधुरी-ऐश्वर्याच्या डान्स मूव्ह्स अजूनही लोकांना आठवतात.
हेही वाचा- ‘तो दोन वर्ष माझ्यासोबत…’, दिग्गज अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले राजेश खट्टर, हॉलिवूडमध्ये केलंय काम!
फाल्गुनी पाठक यांचे गाणे रिमिक्स केल्याने नेहा कक्कर झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘चांगल्या गाण्याची वाट…’