Monday, July 1, 2024

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहूप्रतीक्षित ‘झिम्मा’, चलचित्र कंपनीने ट्वीट करून दिली माहिती

कोरोना विषाणूने अनेकांचे जीवन विस्कळीत केले. गेल्या दोन वर्षापासून या विषाणूने जगभर नुसते थैमान घातले होते. या विषाणूचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. परंतु चित्रपटसृष्टीवर याचा सर्वाधिक परिणाम झालेला दिसून आला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही. अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, परंतु यामुळे चित्रपटाची कमाई होऊ शकली नाही. अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी रखडले होते. यातीलच एक नवा चित्रपट म्हणजे ‘झिम्मा’. ‘झिम्मा’ हा चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी रखडला होता. आता कुठे जाऊन तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रातली सगळी चित्रपटगृह खुली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘झिम्मा’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे. यानिमित्त चलचित्र कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दोन वर्ष ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. ती गोष्ट आता खरी ठरतीये. मराठी माणसाच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहाची कवाडं उघडून ‘झिम्मा’ हा आमचा चित्रपट अवघ्या १३ दिवसात तुमचा होतोय.” (Jhimma movie will release on 11 novembar production company give information on tweeter)

‘झिम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर ९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आहेत. तसेच आदित्य बेडेकरने या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. या चित्रपटात क्षितीज जोग, मृण्मयी गोड बोला, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी आणि निर्मिती सावंत हे कलाकार दिसणार आहे. चित्रपटाची कहाणी काही वेगळी आणि खुमासदार असणार आहे. यात सात बायका लंडनला ट्रीपला जाणार आहेत. वेगवेगळ्या स्वभाव गुणाच्या बायका एकत्र आल्यावर काय होणार आहे, हे आता आपल्याला‌ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णी ऐतिहासिक भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ होणार २०२२ मध्ये प्रदर्शित

-‘बिग बॉस मराठी’च्या घरातून ‘या’ स्पर्धकांची होणार एक्झिट?, प्रेक्षकांनी दिला कौल

-‘दुसऱ्यांची लायकी काढणारा हा कोण?’ जय आणि विशालच्या भांडणात नेटकऱ्यांनी केला जयवर संताप व्यक्त

हे देखील वाचा