Tuesday, December 3, 2024
Home कॅलेंडर Death Anniversary | ‘धोका, त्रास अन् वेदना…’, जिया खानने आत्महत्येआधी लिहलेलं पत्र वाचून पाणावतील डोळे

Death Anniversary | ‘धोका, त्रास अन् वेदना…’, जिया खानने आत्महत्येआधी लिहलेलं पत्र वाचून पाणावतील डोळे

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नवोदित कलाकारांच्या मृत्यूने प्रत्येकालाच धक्का दिला आहे. यशाकडे वाटचाल सुरू असतानाच या कलाकारांनी असा निर्णय का घेतला असावा, हे एक न उलगडलेलं कोड आहे. अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) आत्महत्येनेसुद्धा प्रत्येकाला नि:शब्द केले होते. जियाने आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिला भोगाव्या लागलेल्या अनंत अडचणींची यादी मांडली होती. शुक्रवारी (३ जून) जियाची पुण्यतिती आहे. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या मृत्युबद्दल काही गोष्टी…

हिंदी चित्रपट जगतात अल्पावधीत यशस्वी झालेल्या अभिनेत्रींमध्ये जिया खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जियाच्या नाजुक, मनमोहक सौंदर्याचे अनेक चाहते आजही पाहायला मिळतात. जियाच्या मृत्युने या सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. (jiah khan death anniversary reason of her suicide)

जियाचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ ला नियॉर्कमध्ये झाला. जियाची आईसुद्धा एक अभिनेत्री होती. लहानपणापासून अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या जियाने वयाच्या सोळाव्या वर्षापासून अभिनय करण्यास प्रारंभ केला होता. ‘नि:शब्द’ चित्रपटातून जियाने हिंदी चित्रपट जगतात दमदार आगमन केले. तिच्या या पहिल्याच चित्रपटाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यानंतर जियाने आमिर खानच्या (Aamir Khan) ‘गजनी’ चित्रपटात काम केले. या चित्रपटातील भूमिकेने जियाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली, यानंतर जिया लोकप्रिय होत गेली.

मात्र याच काळात तिची आणि आदित्य पांचोलीचा (Aditya Pancholi) मुलगा सुरज पांचोलीची (Suraj Pancholi) घटट् मैत्री झाली आणि याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या प्रेमात काही काळाने दुरावा येऊ लागला. जियाच्या मृत्यु दिवशीसुद्धा तिने सुरजला कॉल केले होते. मात्र सुरजने एकही कॉल उचलला नाही. जियाच्या मृत्युनंतर तिने लिहलेल्या चिठ्ठीची सर्वात जास्त चर्चा झाली. यामध्ये तिने प्रेम, धोका आणि तिला झालेल्या वेदना याबद्दल लिहिले होते.

यामध्ये जिया म्हणते की, “तुला कसे सांगू समजत नाही. पण आता गमावायला काहीही राहिले नाही. सगळं सांगायची हीच वेळ आहे. मी सगळं गमावलं आहे. जर तू हे पत्र वाचत असशील, तेव्हा मी या जगातून गेली आहे. मी खूप दुखावली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. मात्र तू मला गमावलंस, त्रास दिलास. आता मला काहीच चांगलं दिसत नाही. सकाळी उठू वाटत नाही. कधी काळी मी माझा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी जगत होते. तुझ्या नजरेत सुंदर दिसण्यासाठी रोज नटत होते. कधीतरी आपण सोबत असू अशी आशा होती. पण तू या सगळ्या आशा संपवल्यास. मी कधीच कोणावर इतके प्रेम केले नाही. कोणाचीही इतकी काळजी केली नाही. परंतु या बदल्यात मला फक्त धोका मिळाला. तुझ्यासाठी मी गिफ्ट आणायचे. तुझ्यासाठी तयार व्हायचे, पण तुला काही फरक पडला नाही. प्रेग्नेंट व्हायची भीती होती, पण तरीही स्वतःला तुझ्या स्वाधीन केले. पण तू मला खूप त्रास दिलास, मला मारून टाकलेस.”

जियाचे हे दुखःद पत्र वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. इतक्या प्रतिभावान अभिनेत्रीने घेतलेला हा निर्णय प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा