Monday, February 24, 2025
Home मराठी ‘तुला ऐकू येतं का मी हसताना…’, म्हणत जितेंद्र जोशीने स्मिता तांबेच्या मुलींसाठी लिहिली खास कविता

‘तुला ऐकू येतं का मी हसताना…’, म्हणत जितेंद्र जोशीने स्मिता तांबेच्या मुलींसाठी लिहिली खास कविता

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबेने या वर्षी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. तिने शनिवारी (४ सप्टेंबर ) तिच्या मुलीला जन्म दिला. त्यामुळे तिच्या घरात आनंदाचे वातावरण होते. अशातच स्मिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले होते. तसेच स्मिताचा मित्र आणि अभिनेता जितेंद्र जोशी याने स्मिताच्या मुलीचा फोटो शेअर करून एक कॅप्शन देऊन तिच्या मुलीसाठी एक सुंदर कविता रचली आहे.

जितेंद्र जोशी याने स्मिता आणि तिच्या मुलीचे काही फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्मिता तिची चिमुकली आणि तिच्या पतीसोबत दिसत असून, त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करून त्याने एक कॅप्शन दिले आहे.

जितेंद्र जोशीने लिहिले आहे की, “प्रिय स्मिता, आजवरच्या तुझ्या आयुष्यात तू जे काही पाहिलं, काम केलस, अनुभव घेतलास. त्या सर्व गोष्टी करताना तू ठामपणे स्वतः सोबत उभी राहिलीस. तुझ्यासोबत ‘हमिदाबाईची कोठी’ नाटकात काम करताना मी तुला कधीही सांगू शकलो नाही की, तू किती प्रामाणिक आणि मेहनती नटी आहेस.‌ आपली घट्ट मैत्री वगैरे नाही, ना आपली कधी तासनतास गप्पा मारल्या. तरी तुझं काहीतरी चांगलं होवो आणि तुला तुझ्या आयुष्यात सुख लाभो ही इच्छा माझ्या मनात होती. तू आई झाल्याची बातमी आज मला समजली आणि वैदिकासोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं. तुझ्या पुढच्या वैवाहिक, व्यावसायिक, सामाजिक आयुष्यात तुला भरभरून सुख मिळो हीच प्रार्थना. सुमित्रा भावे यांच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये एक स्त्री गर्भार राहते तेव्हा तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं. अशी कल्पना करून एक छोटी कविता लिहिली होती आणि त्याला अर्पण.” (Jitendra Joshi make a beautiful poem for smita tambe’s daughter)

पुढे त्याने कविता सादर करताना लिहिले की,
“तुला ऐकू येतं का
मी हसताना
सांग कूस बदलून
ऊर समजतो का
मी पळताना
सांग पाय हलवून
तुला कळतं का घर
येई ओठी थरथर
बेंबीतून भरभर
लाल लाल सरसर
पोटा आत तुझं पोट
सुद्धा भरतं का
सांग गुदगुल्या करून
माझा जीव तुझा श्वास
माझे डोळे तुझी आस
माझी जीभ तुझी चव
चल झोप आता बास
डोळ्या आत डोळे गात
स्वप्न पडतं का
सांग स्वप्नात येऊन.”

त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार तसेच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्या या पोस्टवर उर्मिला कोठारेने “वाह जित्या सुंदर” अशी कमेंट केली आहे. तर तेजस्विनी पंडितने “आजकाल कुठे पाहायला मिळते जुजबी ओळखी विषयीची सद्भावना वाह जितू.” अवधूत गुप्तेने “किती गोड रे मित्रा” अशी कमेंट केली आहे. यासोबत अनेक कलाकारांनी त्याच्या या कवितेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच चाहते देखील या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा