गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली होती. आलिया भट्टपासून ते अनन्या पांडेपर्यंत नवे अपार्टमेंट घेतले होते. आता या यादीत ‘पठाण’ अभिनेता जॉन अब्राहमचाही समावेश झाला आहे. जॉन अब्राहमने लिंकिंग रोड, खार, मुंबई येथे एका बंगल्यासाठी डील फायनल केली आहे. त्यांनी 75 कोटी रुपयांची नवीन मालमत्ता खरेदी केली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्याने 27 डिसेंबर 2023 रोजी 70.8 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. 4.25 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आली. जॉनने खरेदी केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ ७ हजार ७२२ स्क्वेअर फूट आहे तर बंगल्याचे क्षेत्रफळ ५ हजार ४१६ स्क्वेअर फूट आहे. जॉन अब्राहम या मालमत्तेबाबत काय योजना आखत आहे, याचा खुलासा झालेला नाही. जॉनची नवीन मालमत्ता, 372 निर्मल भवन, हे ग्राउंड-प्लस-दोमजली बांधकाम आहे. ही मालमत्ता प्रवीण नाथलाल शहा आणि कुटुंबीयांची होती.
माध्यमातील वृत्तानुसार प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनी सांगितले की, हा प्लॉट लिंकिंग रोडच्या प्राइम एरियामध्ये आहे, ज्यामध्ये शहरातील सर्वात जास्त व्यावसायिक मालमत्ता दर आहेत. अहवालानुसार, Lias Foras चे पंकज कपूर म्हणाले, “लिंकिंग रोडवरील किरकोळ दुकानाचे भाडे 800 रुपये प्रति चौरस फुटापेक्षा जास्त आहे. हे भारतातील सर्वात महागड्या किरकोळ बाजारांपैकी एक आहे.”
रियल इस्टेटमध्ये भरपूर गुंतवणूक करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत जॉन अब्राहमचा समावेश आहे. 2009 मध्ये, त्याने रतनश या पारशी कुटुंबाकडून पेटिट शाळेजवळील युनियन पार्कमध्ये एक प्राइम प्लॉट विकत घेतला.
जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचा शेवटचा रिलीज झालेला शाहरुख खानसोबतचा ‘पठाण’ होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. जॉनने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती आणि त्याची भूमिकाही खूप आवडली होती. जॉनकडे अनेक आगामी प्रोजेक्ट्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
याला काय अर्थ आहे राव! एवढी भारी गाणी पण कोरिओग्राफरला काहीच क्रेडिट नाही, ‘फायटर’ चित्रपटातील सत्य समोर
2024 मध्ये ‘हे’ बिग बजेट चित्रपट करणार कल्ला, जाणून घ्या कोण ठरणार नवीन वर्षाचा सुपरहिरो