संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार वाढला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीयेत. सरकार देखील संपूर्ण खबरदारी घेऊन रुग्णांची काळजी घेत आहे. परंतु सोयी सुविधांचा योग्य पुरवठा न झाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लगाला आहे.
भारतातील हे संकट बघून अनेकांनी मदत केली आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते आणि खेळाडूंनी देखील मदत केली आहे. यात बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा देखील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
जॉन अब्राहमने स्वतः या गोष्टीची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, “आपला देश या दिवसात एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. प्रत्येक क्षणासोबत हे संकट वाढतच चालले आहे. यातच अनेक लोकांना ऑक्सिजन, आयसीयू बेडची गरज आहे. परंतु या गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाहीयेत. ही वेळ लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देण्याची आहे.”
त्याने पुढे लिहिले आहे की, “आजपासून सुरुवात करून, मी माझे सगळे सोशल मीडिया अकाउंट एनजीओच्या हवाली दिले आहेत. त्यामुळे आजपासून मी जेवढ्या काही पोस्ट करेल त्याचा फायदा कोरोना पीडितांना होणार आहे. त्यामुळे त्यांना गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळतील. ही वेळ माणुसकी दाखवण्याची आणि या संकटाचा कशाप्रकारे सामना करू शकतो हा विचार करण्याची आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. तुमच्या कुटुंबाची, तुमची आणि देशाची जबाबदारी घ्या.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक
-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर
-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक