अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) ज्याने 2003 मध्ये ‘जिस्म’ या चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली, तो त्याच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वासाठी आणि बाइकप्रेमी स्वभावासाठी ओळखला जातो. जॉनने आपल्या करिअरमध्ये ‘धूम’, ‘रेस 2’, ‘गरम मसाला’ आणि ‘टॅक्सी नंबर9211’ सारखे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, करिअरच्या सुरुवातीला जॉन अब्राहमने करण जोहरच्या (Karan Johar) ‘कभी खुशी कभी गम’मध्ये काम करण्यास नकार दिला होता.
शाहरुख खान (Shahrukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), काजोल (Kajol), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) स्टारर चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्या वर्षी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील एक पात्र जॉन अब्राहमलाही ऑफर करण्यात आले होते, परंतु जॉनने ती भूमिका करण्यास नकार दिला होता. खरं तर या चित्रपटात रॉबी नावाचं पात्र जॉन अब्राहमला ऑफर करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने ही भूमिका नाकारली होती. कारण ही भूमिका खूपच लहान होती, ज्यामध्ये त्याला करीना कपूरचा पाठलाग करावा लागला होता. (john abraham refuse to work in kabhi khushi kabhi gham)
सध्या जॉन अब्राहम त्याच्या आगामी ‘एक व्हिलन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील दिसणार आहेत. ‘पठाण’मध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. (john abraham refuse to work in kabhi khushi kabhi gham)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जॉन अब्राहमला भूतकाळातील चुकांचा पश्चाताप, म्हणाला ‘एक चांगला जोडीदार आणि माणूस बनू शकलो असतो’
जेव्हा पैशांसाठी भावाप्रमाणे जीव लावणाऱ्या सलमानला नडलेला जॉन अब्राहम, पुढं काय झालं वाचाच