Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड कामाप्रती समर्पण असावं तर असं, गेल्या 18 वर्षात जॉन अब्राहमने कामातून घेतली केवळ तीन वेळा सुट्टी

कामाप्रती समर्पण असावं तर असं, गेल्या 18 वर्षात जॉन अब्राहमने कामातून घेतली केवळ तीन वेळा सुट्टी

जॉन अब्राहम हा बॉलिवूडचा हँडसम हंक आहे, ज्याला आजच्या काळातील अॅक्शन स्टार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘फोर्स’ या चित्रपटानंतर जॉनची शैली खूप बदलली आहे आणि आता तो चॉकलेटी हिरो म्हणून नाही तर अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. अलीकडेच जॉन अब्राहम शिल्पा शेट्टीच्या चॅट शो ‘शेप ऑफ यू’मध्ये पोहोचला जिथे त्याने स्वतःशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यापैकी अनेकांना तुम्ही आधीच ओळखत असाल पण काही खुलासे आश्चर्यकारक होते.

शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू शो’मध्ये पोहोचलेल्या जॉन अब्राहमने (john Abraham) सांगितले की, त्याने गेल्या 27 वर्षांपासून मिठाई खाल्ली नाही, खासकरून त्याची आवडती काजू कटली. जॉन अब्राहमच्या मते, साखरेपेक्षा धोकादायक काहीही नाही. सिगारेटपेक्षा हानिकारक जर काही असेल तर ती साखर आहे, त्यामुळे गेल्या 27 वर्षांपासून जॉनने गोड खाणे सोडून दिले. यातूनच त्यांनी करिअरला सुरुवात केली.

जॉन अब्राहमने स्वत:शी संबंधित आणखी एक खास गोष्ट सांगितली की, गेल्या 18 वर्षांत त्याने केवळ ३सुट्ट्या घेतल्या आहेत. मात्र, तो आपला निर्णय अजिबात योग्य मानत नाही. त्यांच्या मते प्रत्येकाने ब्रेक घेतला पाहिजे. त्यांनी जे केले ते खूप कंटाळवाणे आहे. आता लवकरच जॉन अब्राहम ‘अटॅक’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तो सुपर सोल्जरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक अनोखा प्रयोग आहे जो बॉलिवूडमध्ये होणार आहे.

या चित्रपटात जॉन एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक ताकदवान बनला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून 1 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत. (john abraham revealed lotog secret in shilpa sheetys show shape of you)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओटीटीवर कधीच दिसणार नाही जॉन अब्राहम; म्हणाला, ‘मी 299 मध्ये विकणारा माणूस नाही

एकेकाळी जॉन अब्राहमने नाकारली होती शाहरुख खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ची ‘ही’ भूमिका, पण का?

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा