Tuesday, July 9, 2024

‘बुटी शेक म्हणजे नक्की कोणता शेक?’ म्हणत जेमी लिव्हरने उडवली टोनी कक्करच्या गाण्याची खिल्ली

प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर, विनोदाच्या बाबतीत तिच्या वडिलांपेक्षा काही कमी नाही. इतकेच नव्हे, तर जॉनी लिव्हर ज्याप्रमाणे विविध बॉलिवूड कलाकारांची जबरदस्त नक्कल करतात, अगदी त्याचप्रमाणे मुलगी जेमी लिव्हरही अनेक कलाकारांची अप्रतिम नक्कल करते.

जेमीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सुप्रसिद्ध गायिका आशा भोसलेंची नक्कल करत आहे. इतकेच नव्हे, तर तिने टोनी कक्करच्या गाण्याची खिल्लीही उडवली आहे.

जेमीने हा मजेदार व्हिडिओ शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा कोणता शेक हा आहे?’ या व्हिडिओमध्ये ती आशा भोसले बनून, टोनी कक्करच्या नवीन गाण्याबद्दल विचारत आहे. ती म्हणते, “टोनी कक्करचं जे बुटी शेक गाणं आलं आहे, ते काय आहे? कारण मी मिल्क शेक ऐकलंय, वॅनेला शेक ऐकलंय, इतकेच नाही तर प्रोटीन शेकही ऐकलं आहे, पण हा कोणता शेक आहे! हम्म्म्म…यालाच जडीबुटी द्यावी लागेल!” अशा प्रकारे ती टोनी कक्करची मजा घेत आहे.

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत.

जेमी लिव्हरने 2012 मध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. पुढे 2013 मध्ये जेमी ‘कॉमेडी सर्कस के महाबली’ या सोनी एंटरटेनमेंट टीव्ही शोचा भाग राहिली आहे. यासह तिने अनेक शोही होस्ट केले आहेत. तिने बॉलिवूडमध्ये ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल 4’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जेमी लिव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कधी डान्स व्हिडिओद्वारे, तर कधी मिमिक्री व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बघावं ते नवलंच! सामान्य पद्धतीने कपडे परिधान करण्याचा कंटाळा आल्याने, अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही; पाहा व्हिडिओ

-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल

-एकेकाळी महान क्रिकेटपटूच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्रीचा नवीन पिढीच्या तरुणींना मोलाचा सल्ला, म्हणतेय ‘विवाहित पुरुषांच्या…’

हे देखील वाचा