हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप(Johnny Depp) आणि अभिनेत्री अँबर हर्ड(Amber Heard) यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच चर्चेत होत. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. आता या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याची बातमी समोर येत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ या नावाचा एक चित्रपट टुबी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोफत प्रदर्शित होणार आहे. मेलिसा मार्टी ही अभिनेत्री जॉनी डेपच्या वकिलाची भूमिका साकारणार असून मेरी करिग ही अँबरच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात २ महीने सुरू असणाऱ्या मानहानिच्या सुनावणीवरच प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा कोणत्याही कलाकाराचा बायोपिक नसून यामध्ये केवळ तथ्यांच्या आधारेच या केसबद्दल खुलासा केला जाणार आहे.
Johnny Depp, Amber Heard's defamation trial to be the subject of upcoming movie
Read @ANI Story | https://t.co/FBbPPn3ZFT#JohnnyDepp #AmberHeard pic.twitter.com/qi2YvijuCf
— ANI Digital (@ani_digital) September 16, 2022
हा चित्रपट सामाजिकदृष्ट्या वेळेवर बनलेला एक महत्त्वाचा चित्रपट आहे. असं या चित्रपटाच्या मेकर्सचं म्हणणं आहे. जे नाट्य लोकांनी इतके दिवस चवीने पाहिलं त्याचीच पुनरावृत्ती चित्रपटाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेता जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांनी अजूनतरी या चित्रपटासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
हॉट टेक हा फॉक्स एंटरटेनमेंटच्या मारविस्टा एंटरटेनमेंटचा चित्रपट आहे. हा चित्रपट गाय निकोलुची यांनी लिहिला आहे आणि सारा लौहमेनने दिग्दर्शित केला आहे. त्याच वेळी, चित्रपटाची निर्मिती ब्रिटनी क्लेमन्स, अँजी डे, मारियान सी व्हॅंच, हॅना पिल्मर आणि फर्नांडो झे यांनी केली आहे. ऑटम फेडेरिकी आणि क्रिस्टोफर सिविजटिक निर्माते म्हणून त्यांच्या नवव्या हाऊस बॅनरखाली काम केले.
जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांची भेट 2011 मध्ये ‘द रम डायरी’च्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि फेब्रुवारी 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले. एक वर्षानंतर, 2016 मध्ये, दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर जॉनी डेपने 2018 च्या वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात अँबर हर्डची बदनामी केल्याबद्दल दावा दाखल केला ज्यामध्ये तिने स्वत: ला घरगुती अत्याचाराचा बळी म्हणून वर्णन केले. यानंतर जॉनीने मानहानीचा खटला जिंकला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दोन दाक्षिणात्य दिग्गजांनी ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीमध्ये मिळवले स्थान? चाहत्यांमध्ये आनंदाची लाट
महाराष्ट्रात राडा घालायला ‘राडा’ सिनेमा सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी गौरी प्रधान टेलिव्हिजनवरून झाली गायब, पतीसोबत संसारात आहे मग्न