Friday, May 24, 2024

एक्स पत्नीविरुद्ध खटला जिंकल्यानंतर पुन्हा चर्चेत आला जॉनी डेप, पेंटिंग्स विक्रीतून कमावले ‘एवढे’ कोटी

मागील काही दिवसांपासून हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप हा भलताच चर्चेत होते. त्याचे एक्स पत्नी एंबर हर्ड हिच्याशी खटकल्यामुळे प्रकरण थेट कोर्टापर्यंत पोहोचले होते. मात्र, या प्रकरणाचा निकाल अभिनेता जॉनीच्या बाजूने लागला होता. तेव्हापासून तो भलताच आनंदात आहे. यानंतरही तो या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी तो त्याच्या पेंटिंग्समुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या पेंटिंग्स या तब्बल कोट्यवधी रुपयांना विकण्यात आले आहेत.

जॉनी डेपने स्वत: सांगितलेली पेंटिंगचा होणार लिलाव
अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) याने बनवलेल्या पेंटिंगचे कलेक्शन यूकेमधील एका गॅलेरी चैनमार्फत तब्बल ३ मिलियन पाऊंड म्हणजेच २८ कोटी ९० लाख रुपयांना विकले गेले आहेत. जॉनी याने मागील काही दिवसांमध्ये एंबर हर्ड (Amber Heard) हिच्याविरुद्ध लढत असलेल्या प्रकरणामध्ये लाखो डॉलर्स खर्च केले होते. जॉनीने आधीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पेंटिंग्सच्या प्रिंट्सचा लिलाव करण्याची घोषणा केली होती. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, त्याच्या पेंटिंग्सचा लिलाव ऑनलाईन कॅसेल फाऊन आर्ट करेल, जो यूकेमध्ये आर्ट गॅलेरींची चैन चालवतो. या पेंटिंगमध्ये जॉनीने गायक बॉब डिलन याचा चेहरा बनवला होता.

वेबसाईट क्रॅश, काहीच वेळात विकले गेले प्रिंट्स
गॅलेरीने जॉनीच्या हवाल्याने लिहिले की, “माझ्या पेंटिंग्सने माझे आयुष्य घेरले आहे. मात्र, मी त्यांना नेहमीच आपल्यापर्यंत ठेवले आणि स्वत:ला मर्यादित ठेवले. कोणीही कधीही स्वत:ला मर्यादित ठेवले नाही पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Johnny Depp (@johnnydepp)

जॉनीचे पेंटिंग्समध्ये बॉब डिलन याच्याव्यतिरिक्त अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, अभिनेता अल पचीनो आणि रोलिंग स्टोन कीथ रिचर्ड्स हे दिसत आहेत. गॅलेरी चैनने म्हटले की, जॉनी डेपच्या पेंटिंग्सची इतकी जबरदस्त मागणी होती की, त्यांची वेबसाईटच क्रॅश झाली होती. त्यामुळे गुरुवारी (दि. २८ जुलै) सायंकाळपर्यंत पेंटिंग्सचे सर्वच्या सर्व ७८० प्रिंट्स विकले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’
‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव
‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासा

हे देखील वाचा