Saturday, June 29, 2024

‘तेव्हा धर्मेंद्र यांनी लिफ्टमध्येच ‘त्या’ व्यक्तीला मारलं; जॉनी लिव्हरने सांगितला मजेशीर किस्सा

अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अशातच बॉलिवूडचा विनोदाचा बादशहा जॉनी लिव्हरने धर्मेंद्र यांच्याबद्दल मजेशीर किस्सा सांगितला आहे.

जॉनी लिव्हरने अभिनय क्षेत्राच्या प्रवासादरम्यान अनेक स्टार अभिनेत्यांसोबत काम केले आहे. एका मुलाखतीत जॉनी लिव्हर यांनी स्टार अभिनेत्यांसोबत काम करताना आलेला अनुभाव तसेच मजेशीर काही किस्से आपल्या चाहत्यांना शेअर करत आहेत.

धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगताना जॉनी लिव्हर यांनी त्यांचा उल्लेख रिअल मॅन असा केला आहे. तो पुढे म्हणाला, ‘धर्मेंद्र पाजी खुप धाडसी आहे. जसे आतुन आहेत तसेच बाहेरुनदेखील. खुप चांगला माणुस आहे. जमीनसोबत जोडलेला माणुस म्हणायला हरकत नाही. पण त्यांना राग आला तर मागे पुढे न पाहता एक ठेवून देतात.

असाच एक किस्सा जॉनि लिव्हरने शेअर केला आहे. मला एका व्यक्तीने एक घटना सांगतली. एके दिवशी धर्मेंद्र लिफ्टमधून जात होते. त्यामध्ये आणखी एक व्यक्ती होती. त्यावेळ धर्मेंद्र यांना तुम्ही धर्मेंद्र आहात का? विश्वास बसत नाही तुम्ही आहात? व्यक्तीच्या या प्रश्नावर धर्मेंद्र यांनी मौन बाळगत त्याला एका ठोसा दिला आणि विचारले आता विश्वास बसला का? त्यानंतर ते लिफ्टमधून निघून गेले. धर्मेंद्र आणि विनोद खन्ना हे दोघे खुप धाडसी आहेत. मात्र, त्यांना कोर्टांत फेल्या माराव्या लागत आहेत.

तसेच यावेळी जॉनी लिव्हर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत भेट झाल्याची सांगितले. या भेटीदरम्यान, त्यांना मी तुमचा खुप मोठा चाहता असल्याचे सांगितले. यासोबतच, मी फूल और पत्थर हा चित्रपट १५ वेळा पाहिला असल्याचे सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीर कपुरने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘माझ्यासाठी मुकेश अंबानी…
रणबीर कपुरने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘माझ्यासाठी मुकेश अंबानी…’

हे देखील वाचा