Tuesday, July 9, 2024

‘जॉनी लीवर’च्या मुलीचा ‘मुकाबला’ गाण्यावर भन्नाट डान्स, फॅन्सकडून मिळाली आलिया, अनन्यापेक्षा भारी डान्सची पोचपावती

प्रसिद्ध स्टॅन्डअप कॉमेडियन ‘जेमी लीवर’. जेमीची दुसरी ओळख म्हणजे ती कॉमेडीकिंग जॉनी लीवर यांची मुलगी आहे. मात्र, जेमीने तिच्या कॉमेडीने स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. जेमी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावतानाही दिसत असते. जेमी तिच्या कॉमेडीच्या टायमिंगमुळे, तिच्या मिमिक्रीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. सध्या जेमी तिचे नवीन टॅलेंट लोकांसमोर आणताना दिसत आहे.

नुकताच जेमीने यूट्यूबवर तिचा एक जबराट डान्स व्हिडिओ अपलोड केला आहे. जेमी बॉलिवूडमधील ‘मुकाबला’ या गाण्यावर कोरिओग्राफर राजेश जेठवा सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून हा व्हिडिओ इंटरनेटवरही तुफान व्हायरल होत आहे. सोबतच तिचे फॅन्स तिच्या या व्हिडिओला ‘एक से बढकर एक’ कमेंट्स देखील करत आहे.

जेमीच्या या व्हिडिओवर एकाने लिहिले की, ‘तुझा डान्स आलिया, अनन्या आणि इतर स्टार किड्सपेक्षा १०० पटीने चांगला आहे.’

सोबतच तिचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात ती कोरोना लसीवर बोलताना दिसत आहे. सोबतच तिने सोनम कपूर, करीना कपूर, फराह खान, आशा भोसले, कंगना राणावत यांसारख्या कलाकारांची मिमिक्री केली आहे.

जेमीने २०१२ साली तिच्या स्टॅन्डअप कॉमेडीच्या करियरला सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत अनेक शो केले असून ती टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कॉमेडी सर्कस के महाबली’मध्ये सुद्धा दिसली होती.

तिने ‘किस किस को प्यार करू’ आणि ‘हाऊसफुल ४’ मध्ये देखील काम केले आहे. जेमीला सोशल मीडियावर लाखो चाहते फॉलो करतात.

महत्त्वाच्या बातम्या-

मुला-मुलींचा डान्स तर तुम्ही पाहिला असेलच; एकदा ‘या’ वृद्ध जोडप्याचा ‘वो चली’ गाण्यावरचा भन्नाट डान्सही पाहा

मराठमोळ्या रितेश- जेनेलिया यांनी आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी बांधली होती लगीनगाठ, पाहा ‘या’ जोडीचे खास व्हिडिओ

उर्वशीच्या नजरेचा तीर अन् चाहत्यांच्या थेट काळजावर घाव! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्ही ‘त्या’ प्रियालाही विसराल

 

हे देखील वाचा